​‘देवसेना’ अनुष्का शेट्टीने लाडक्या प्रभासला वाढदिवसाची काय दिली भेट? जाणून घेण्यासाठी वाचा बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 14:46 IST2017-10-23T09:00:08+5:302017-10-23T14:46:48+5:30

‘देवसेना’ अनुष्का शेट्टी आज जाम खूश आहे. या आनंदाचे कारण अर्थातच प्रभासचा वाढदिवस आहे. होय, आज (२३ आॅक्टोबर) प्रभासचा ...

'DevSena' Anushka Shetty gives birthday gift to Ladki Prabhas? Read the news to know | ​‘देवसेना’ अनुष्का शेट्टीने लाडक्या प्रभासला वाढदिवसाची काय दिली भेट? जाणून घेण्यासाठी वाचा बातमी

​‘देवसेना’ अनुष्का शेट्टीने लाडक्या प्रभासला वाढदिवसाची काय दिली भेट? जाणून घेण्यासाठी वाचा बातमी

ेवसेना’ अनुष्का शेट्टी आज जाम खूश आहे. या आनंदाचे कारण अर्थातच प्रभासचा वाढदिवस आहे. होय, आज (२३ आॅक्टोबर) प्रभासचा वाढदिवस आहे. ‘बाहुबली’च्या सेटवर अनुष्का व प्रभास यांनी ‘क्वालिटी टाईम’ एकत्र घालवला. यानंतर प्रभासच्या ‘साहो’ या आगामी चित्रपटातही अनुष्काचीच वर्णी लागणार अशी चर्चा रंगली. अर्थात अनुष्काची ही संधी अगदी थोडक्यात सुटली आणि यासोबतच पुन्हा एकदा ‘क्वालिटी टाईम’ घालवण्याची संधीही हुकली. पण म्हणून अनुष्का प्रभासचा वाढदिवस थोडीच विसरणार? अनुष्काने केवळ प्रभासचा वाढदिवस लक्षातच ठेवला नाही तर तो सेलिब्रेटही केला. होय, तेही प्रभासला एक सुंदर भेटवस्तू देऊन. आता ही सुंदर भेट कुठली? हे जाणून घेण्यास तुम्ही नक्की उत्सूक असाल.  अनुष्काच्या जवळच्या सूत्रांनी दिलेली माहिती खरी मानाल तर अनुष्काने प्रभासला आज त्याच्या वाढदिवसाला एक डिझाईनर मनगटी घड्याळ भेट दिले. होय, प्रभास मनगटी घड्याळांबाबत कमालीचा क्रेझी आहे. असे असताना प्रभाससाठी यापेक्षा दुसरी चांगली भेट कुठली बरी असू शकेल?

ALSO READ: ‘बाहुबली’ प्रभासने चाहत्यांना दिली वाढदिवसाची भेट; ‘साहो’चे फर्स्ट लूक जारी!

‘बाहुबली2’नंतर प्रभास व अनुष्काच्या लिंकअपच्या बातम्या पसरल्या होत्या. या बातम्या अद्यापही थांबलेल्या नाहीत. आता तर दोघेही लग्न करणार, इथपर्यंत चर्चा रंगलीयं. या  चर्चा ऐकून ऐकून प्रभासही गोंधळला आहे. त्याच्यात अन् अनुष्कातखरोखरचं काहीतरी आहे, असे त्याला वाटू लागलेय. होय, ताज्या मुलाखतीत खुद्द प्रभास हे बोलून गेला होता. या मुलाखतीत  अनुष्कासोबतच्या लिंकअपबाबत त्याला प्रश्न विचारला गेला होता. हा प्रश्न ऐकून प्रभास गालातल्या गालात हसला होता. ‘मी व अनुष्का गेल्या ९ वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आपल्या लिंकअपच्या बातम्या होऊ द्यायच्या नाहीत, हे आम्ही फार पूर्वीच ठरवले होते. पण या बातम्या येत राहिल्या आणि आता...? आता तर आमच्यात काही तरी आहे, असे मलाही वाटू लागले आहे,’ असे प्रभास यावर म्हणाला होता. आता प्रभासचे हे बोलणे गमतीत होते की तो खरचं सीरिअस होता, हे मात्र आम्हाला ठाऊक नाही.

Web Title: 'DevSena' Anushka Shetty gives birthday gift to Ladki Prabhas? Read the news to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.