‘देवदास’ खूप बघितले; नववर्षात ‘दासदेव’ बघा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 15:21 IST2018-01-01T09:51:10+5:302018-01-01T15:21:10+5:30
बंगाली साहित्यिक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘देवदास’ या कादंबरीची अनेक रूपे मोठ्या पडद्यावर आलीत. जवळपास प्रत्येक भाषेत या कादंबरीवर चित्रपट ...

‘देवदास’ खूप बघितले; नववर्षात ‘दासदेव’ बघा!!
ब गाली साहित्यिक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘देवदास’ या कादंबरीची अनेक रूपे मोठ्या पडद्यावर आलीत. जवळपास प्रत्येक भाषेत या कादंबरीवर चित्रपट बनलायं. हिंदी सिनेमाबद्दल बोलायचे तर येथे वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी ‘देवदास’ची वेगवेगळी रूपे पडद्यावर दाखवलीत. आता या कादंबरीचे एक नवे रूप, नवा अंदाज पडद्यावर पाहायला मिळणार आहे. होय, दिग्दर्शक सुधीर मिश्रा हा नवा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे नाव आहे, ‘दासदेव’. येत्या १६ फेबु्रवारी रिलीज होऊ घातलेल्या या चित्रपटात अभिनेता राहुल भट्ट देवदासच्या भूमिकेत दिसणार आहे. अर्थात राहुल भट्ट साकारत असलेला हा देवदास थोडा वेगळा असणार आहे. कारण चित्रपटाची पार्श्वभूमी राजकीय असणार आहे. ‘दासदेव’मध्ये अभिनेत्री रिचा चड्ढा पारोची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर अदिती राव हैदरी चंद्रमुखीची भूमिका साकारणार आहे.
![]()
१९२८ मध्ये ‘देवदास’ वर सर्वप्रथम मूकपट बनवला गेला होता. नरेश मित्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या या मूकपटात फणी बर्मा यांनी देवदास साकारला होता तर तारकबालाने पारो आणि पारूलबालाने चंद्रमुखी साकारली होती. यानंतर १९३५ मध्ये पीसी बरूआ यांनी बंगालीत ‘देवदास’ साकारला. यात केएल सहगल टायटल रोलमध्ये होते. १९३७ मध्ये हाच चित्रपट हिंदीतही रिलीज केला गेला. यापश्चात १९५५ मध्ये विमल राय यांनी ‘देवदास’ चित्रपट बनवला. यात दिलीप कुमार मुख्य भूमिकेत होते. याच चित्रपटाने दिलीप कुमार यांना ट्रॅजेडी किंग ही ओळख दिली होती. या सुचित्रा सेन यांनी पारोची तर वैजयंती माला यांनी चंद्रमुखीची भूमिका साकारली होती. २००२ मध्ये संजय लीला भन्साळी अभिनेता शाहरूख खानला देवदासच्या रूपात प्रेक्षकांसमोर घेऊन आलेत. यात माधुरी दीक्षित चंद्रमुखीच्या तर ऐश्वर्या राय पारोच्या भूमिकेत होती.
गुलजार यांनाही देवदासचे एक व्हर्जन बनवायचे होते. यासाठी त्यांनी देवदासच्या भूमिकेसाठी धर्मेन्द्र यांची तर चंद्रमुखी व पारोच्या भूमिकेसाठी शर्मिला टागोर व हेमा मालिनी यांना फायनल केले होते. या चित्रपटाचे मुहूर्तही ठरले होते. पण दुर्दैवाने हा चित्रपट रखडला होता.