देवसेना अनुष्का शेट्टीला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी ‘हे’ तीन निर्माते झाले उतावीळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2017 19:34 IST2017-05-05T14:02:10+5:302017-05-05T19:34:29+5:30

बाहुबली सीरिजचा दुसरा चित्रपट ‘बाहुबली-२’ रिलीज होऊन एक आठवडादेखील झाला नाही; तोच ‘बाहुबली’ कलाकारांसाठी बॉलिवूडकरांनी सर्व दरवाजे उघडले आहेत. ...

Devasena to launch Anushka Shetty in 'Three' to become Bollywood! | देवसेना अनुष्का शेट्टीला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी ‘हे’ तीन निर्माते झाले उतावीळ!

देवसेना अनुष्का शेट्टीला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी ‘हे’ तीन निर्माते झाले उतावीळ!

हुबली सीरिजचा दुसरा चित्रपट ‘बाहुबली-२’ रिलीज होऊन एक आठवडादेखील झाला नाही; तोच ‘बाहुबली’ कलाकारांसाठी बॉलिवूडकरांनी सर्व दरवाजे उघडले आहेत. बाहुबली अर्थात प्रभासला अनेक चित्रपटांच्या आॅफर्स येत असतानाच देवसेना अर्थात अनुष्का शेट्टी हिला लॉन्च करण्यासाठी बॉलिवूडचे तीन निर्माते अक्षरश: उतावीळ आहेत. अनुष्काने बाहुबलीमध्ये साकारलेल्या भूमिकेवर हे तिन्ही निर्माते फिदा झाले आहेत. अनुष्काच्या अदांनी घायाळ झालेले हे निर्माते आता तिला लॉन्च करण्यासाठी धडपड करीत आहेत. आता तुम्ही विचार करीत असाल हे तीन निर्माते कोण? तर हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली माहिती वाचावी लागेल. 



१) बोनी कपूर : बॉलिवूडमधील प्रसिद्ध नाव असलेले बोनी कपूर अनुष्का शेट्टीला लॉन्च करण्यास उत्सुक आहेत. बोनी कपूर यांनी ‘मिस्टर इंडिया, रूप की रानी चोरों का राजा’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. सध्या ते अनुष्का शेट्टीला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी प्लॅनिंग करीत आहेत. वृत्तानुसार बोनी कपूर यांची पत्नी श्रीदेवीही अनुष्काला लॉन्च करण्यास उत्सुक आहे. या कामात ती स्वत: रस दाखवित असल्याने बोनी कपूरही उत्सुक आहेत. त्यामुळे जर बोनी कपूर यांनी अनुष्काला लॉन्च केले तर त्यामध्ये श्रीदेवीचा मोठा वाटा असेल हे निश्चित. 



२) यशराज प्रॉडक्शन : नव्या टॅलेण्टला लॉन्च करण्यात यशराज प्रॉडक्शन आघाडीवर आहे. मग, तो कलाकार असो वा दिग्दर्शक. वृत्तानुसार आदित्य चोपडाचे हे प्रॉडक्शन हाउससुध्दा अनुष्काला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यास उत्सुक आहे. यासाठी आदित्य चोपडा त्याचा जवळचा मित्र करण जोहर याची मदत घेण्याची शक्यता आहे. करणने ‘बाहुबली’ला हिंदी भाषिक क्षेत्रात डिस्ट्रीब्यूट करण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. अशात तो ‘बाहुबली’च्या सर्व कलाकारांच्या जवळचा आहे. त्यामुळे त्याने अनुष्काला शब्द टाकल्यास तिच्याकडून नकार येण्याची शक्यता खूपच कमी आहे. 



विधू विनोद चोपडा : विधू विनोद चोपडा बॉलिवूडमधील असे नाव आहे, ज्यांनी बॉलिवूडला केवळ सर्वोत्कृष्ट कलाकारच दिले नाहीत तर असे काही सर्वोत्कृष्ट चित्रपट दिले आहेत जे वर्षानुवर्ष प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील. आता विधू विनोद चोपडा अनुष्काला लॉन्च करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यासाठी त्यांनी काही योजना आखल्याचेही बोलले जात आहे. 
वरील तिन्ही नावे बॉलिवूडमधील दिग्गजांच्या यादीमधील असून, अनुष्का कोणाचा प्रस्ताव स्वीकारेल हे तिलाही सांगणेही मुश्किल होईल यात शंका नाही. कारण या तिघांचा प्रस्ताव नाकारणे अनुष्काला अवघड होणार आहे. पण काहीही म्हणा अनुष्का बॉलिवूडमध्ये आल्यास, तिच्या फॅन्सना आनंद होईल यात शंका नाही. 

Web Title: Devasena to launch Anushka Shetty in 'Three' to become Bollywood!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.