'देवसेना’ अनुष्का शेट्टी 140 कोटी रुपये संपत्तीची मालकीण,आकडा ऐकून तुमचेही डोळे पांढरे होतील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 13:46 IST2017-10-05T08:15:33+5:302017-10-05T13:46:05+5:30
‘बाहुबली’ सिनेमात झळकलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिची बी-टाऊनसह दाक्षिणात्य चित्रसृष्टीत सुपरडुपर हिट ठरली आहे. जादा मानधनाची मागणी केल्याच्या कारणामुळे ...

'देवसेना’ अनुष्का शेट्टी 140 कोटी रुपये संपत्तीची मालकीण,आकडा ऐकून तुमचेही डोळे पांढरे होतील!
‘ ाहुबली’ सिनेमात झळकलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिची बी-टाऊनसह दाक्षिणात्य चित्रसृष्टीत सुपरडुपर हिट ठरली आहे. जादा मानधनाची मागणी केल्याच्या कारणामुळे अनुष्का शेट्टीची साहो या सिनेमातून एक्झिट झालीय. याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. प्रभाससह बाहुबली आणि इतर विविध सिनेमातून झळकलेल्या अनुष्का शेट्टीला मात्र साहोमधून एक्झिट झाली तर फारसा फरक पडणार नाही. मानधन तिच्यासाठी किरकोळ गोष्ट आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आम्ही असं का म्हटलं आहे याचं कारणही अगदी तसंच आहे. कारण एका वृत्तानुसार अनुष्का शेट्टी 22 मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 140 कोटी रुपये संपत्तीची मालकीण आहे. हैदराबादमधील पॉश वसाहतींपैकी एक ज्युबली हिल्स इथल्या वुड्स अपार्टमेंटमध्ये सहाव्या मजल्यावर अनुष्काचं आलिशान आणि प्रशस्त घर आहे. आलिशान कारची शौकिन असलेल्या अनुष्काकडे विविध ब्रँड्सच्या कार आहेत. यांत बीएमडब्ल्यू 6, ऑडी ए6, ऑडी क्यू5 आणि टोयोटा करोला अशा आलिशान कारचा समावेश आहे. याशिवाय विविध बड्या कंपन्यांची उत्पादनं आणि ज्वेलर्स ब्रँडच्या जाहिरातीसुद्धा अनुष्काकडे आहेत. अनुष्काकडे इतकी संपत्ती आहे की तिने एकदा आपल्या ड्रायव्हरला 12 लाख रुपयांची आलिशान कार भेट म्हणून दिली होती. हिंदीसह अनेक तेलुगू आणि तमिळ सिनेमात अनुष्का झळकली आहे. स्वीटी शेट्टी असं खरं नाव असलेल्या अनुष्काचा जन्म 7 नोव्हेंबर 1981मध्ये झाला आहे. 2005 साली आलेल्या सुपर या तेलुगू सिनेमातून अनुष्काने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. अनुष्काने बाहुबली या सिनेमासह विक्रमारकुडू, अरुंधती, वेदम, रुद्रमादेवी, सिंघम सीरीज अशा सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे. एका सिनेमासाठी अनुष्का जवळपास 4 ते 5 कोटी रुपये इतकं मानधन स्वीकारते. त्यामुळे साहजिकच तिची संपत्ती 140 कोटींवर आहे. हा आकडा ऐकून तुमचेही डोळे नक्कीच पांढरे झाले असतील, नाही का ?
Also Read:प्रभास अन् अनुष्का शेट्टी डिसेंबरमध्ये करणार साखरपुडा?
Also Read:प्रभास अन् अनुष्का शेट्टी डिसेंबरमध्ये करणार साखरपुडा?