‘रॉक आॅन’ पुरबला आले डिप्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 11:11 IST2016-10-22T11:11:30+5:302016-10-22T11:11:30+5:30

आगामी ‘रॉक आॅन २’ सिनेमातून बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर झळकणारा पुरब कोहली सध्या वाईट काळातून जातोय असे दिसतेय. कारण ...

Depression brought to the fore by 'Rock An' | ‘रॉक आॅन’ पुरबला आले डिप्रेशन

‘रॉक आॅन’ पुरबला आले डिप्रेशन

ामी ‘रॉक आॅन २’ सिनेमातून बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर झळकणारा पुरब कोहली सध्या वाईट काळातून जातोय असे दिसतेय. कारण जवळच्या सुत्रांनुसार, पुरबला नैराश्याचा त्रास असून त्यातून बाहेर पडण्यासाठी तो मानसोउपचार तज्ज्ञांची मदत घेत आहे.

पण त्याला नैराश्य (डिप्रेशन) यायला असे काय झाले? 

सेलिब्रेटींचे जग बाहेरून कितीही ग्लॅमरस वाटत असले तरी त्यासाठी कलाकारांना अंगतोड मेहनत घ्यावी लागते. निखिल आडवाणी दिग्दर्शित ‘प्रिझनर्स आॅफ वॉर’ या मालिकेत पुरब महत्त्वाच्या भूमिकेत आहे. टीव्हीवर असणाऱ्या इतर डेली सोप्सपेक्षा ही मालिका अत्यंत वेगळी आहे.

त्यातील भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी पुरब संपूर्णपणे कॅरेक्टरमध्ये घुसला आहे. युद्धबंदींचे आयुष्य अधिक खोलपणे जाणून घेण्यासाठी त्याने अनेक हिंसक व्हिडिओ पाहिले. कैद्यांची मानसिक अंगीकारण्यासाठी त्याने सर्व ते प्रयत्न केले. याचा परिणाम त्याच्या दैनंदिन जीवनावर होऊ लागला.

Purab

पात्राप्रती त्याचे समर्पण एवढे होते की, एकदा तर त्याला शूटींगमध्येच रडू कोसळले. त्याला डिप्रेशन वाटू लागले. समस्या अधिक गंभीर होऊ नये म्हणून त्याला मानसोउपचार तज्ज्ञांकडे जाऊन उपचार घ्यावे लागले. तो लवकर बरा होऊ दे, अशीच सर्व चाहत्यांबरोबर आमची इच्छा आहे.

गेट वेल सून पुरब!
 

Web Title: Depression brought to the fore by 'Rock An'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.