/>या महिन्यामध्ये अक्षय कुमारचा ‘रुस्तम’ व हृतिक रोशनचा मोहेंजोदडो हे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. या दोघांची बॉक्स आॅफिसवर टक्कर हे निश्चीत आहे. दोघेही आपआपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जोरदार तयारी करीत आहे. हृतिक हा मोहेंजोदडो च्या प्रमोशनसाठी दिल्लीला रवाना झाला आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री पूजा हेगडे सुद्धा असून, दोघेही खूप छान लूकमध्ये दिसत आहेत. पूजाचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट असून, तो सुद्धा हृतिकसोबत असल्याने त्यांच्याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. पहिला चित्रपट हा कोणत्याही कलाकाराचे नशीब ठरवत असतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केले आहे.