DeepVeer Reception:मुंबईत रंगला 'दीपवीर'चा रिसेप्शन सोहळा, जणू अप्सरा असा दीपिका पादुकोणचा रॉयल अंदाज,SEE PICS
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 21:45 IST2018-11-28T21:43:35+5:302018-11-28T21:45:16+5:30
यावेळी दोघांनी पांढऱ्या आणि गोल्डन रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केलाय. या दोघांचा रॉयल लूक साऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी दीपिकाने उपस्थितांना घायाळ केलं.

DeepVeer Reception:मुंबईत रंगला 'दीपवीर'चा रिसेप्शन सोहळा, जणू अप्सरा असा दीपिका पादुकोणचा रॉयल अंदाज,SEE PICS
अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा मुंबईत सुरू झालाय. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आलाय. यावेळी दोघांनी पांढऱ्या आणि गोल्डन रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केलाय. या दोघांचा रॉयल लूक साऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी दीपिकाने उपस्थितांना घायाळ केलं. दीपिकाचा लूक हा एखादी अप्सरा अवतरली असाच होता. रणवीरने हे फोटो सोशल मीडियावरह शेअर करताच लगेच व्हायरल झाले.
इटलीतील लेक कोमो इथं दीपिका आणि रणवीर यांचं शुभमंगल पार पडलं. १४ नोव्हेंबरला कोंकणी पद्धतीने तर १५ नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने दोघांचं लग्न पार पडलं.दीपिका व रणवीर यांच्या रिसेप्शनमध्ये अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे.