दीपिकाच्या आईवडिलांनी रणवीरसह बघितला 'तमाशा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:57 IST2016-01-16T01:12:29+5:302016-02-07T12:57:37+5:30
दीपिका पदुकोन आणि रणबीर कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'तमाशा' चित्रपटाचा विशेष शो नुकताच मुंबईत यशराज स्टुडिओत आयोजित करण्यात ...

दीपिकाच्या आईवडिलांनी रणवीरसह बघितला 'तमाशा'
द पिका पदुकोन आणि रणबीर कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'तमाशा' चित्रपटाचा विशेष शो नुकताच मुंबईत यशराज स्टुडिओत आयोजित करण्यात आला होता. या शोला माजी बॅडमिंटन खेळाडू आणि दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोन, आई उज्जवला उपस्थित होते. दीपिकाचा खास मित्र रणवीर सिंग हा ही यावेळी आवर्जून आला होता. दीपिका आणि रणबिरसह दिग्दर्शक इम्तियाज अली हेसुद्धा हजर होते. रणबिरची खास मैत्रिण असलेली कॅटरिना कैफ मात्र या कार्यक्रमात दिसली नाही. रणवीरने त्याचा 'बाजीराव मस्तानी'चा लूक दिसू नये म्हणून हॅट घातली होती. दीपिकाने छायाचित्रकारांसाठी हसून पोझ दिली. 'तमाशा' चे निर्माते साजीद नाडियाडवाला हे पत्नी वरदासोबत आले होते. यूटीव्ही मोशन पिर्सचे सीईओ सिद्धार्थ रॉय कपूर तर दिसले पण त्यांची पत्नी अभिनेत्री विद्या बालन मात्र आली नाही.