विन डिझेलला भेटण्यासाठी दीपिकाचे कुटुंब रांगेत, दीपिकाला कळताच काहीसे असे घडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 19:21 IST2017-01-13T19:13:41+5:302017-01-13T19:21:48+5:30

हॉलिवूडचा अ‍ॅक्शन स्टार विन डिझेल गेल्या दोन दिवसांपासून भारतात असून, त्याला बघण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी एकच गर्दी केली आहे. ...

Deepika's family queues up to meet Vin Diesel, something happened to Deepika | विन डिझेलला भेटण्यासाठी दीपिकाचे कुटुंब रांगेत, दीपिकाला कळताच काहीसे असे घडले

विन डिझेलला भेटण्यासाठी दीपिकाचे कुटुंब रांगेत, दीपिकाला कळताच काहीसे असे घडले

लिवूडचा अ‍ॅक्शन स्टार विन डिझेल गेल्या दोन दिवसांपासून भारतात असून, त्याला बघण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी एकच गर्दी केली आहे. या गर्दीत दीपिका पादुकोनचे वडील प्रकाश पादुकोन यांच्यासह तिची आई आणि बहिणीचाही समावेश असून, त्यांना चक्क विनच्या भेटीसाठी रांगेत उभे राहावे लागले आहे; मात्र ही बाब जेव्हा दीपिकाच्या लक्षात आली तेव्हा एकच धावपळ झाल्याने ही भेट चर्चेचा विषय ठरली.



त्याचे झाले असे की, विन डिझेल आणि दीपिका पादुकोन त्यांचा आगामी  ‘एक्सएक्सएक्स : रिटर्न आॅफ जेंडर केज’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये माध्यमांशी बोलत होते. माध्यमांच्या प्रचंड गराड्यात त्यांच्या मुलाखती सुरू होत्या. अशात अचानक दीपिकाचे वडील प्रकाश पादुकोन, आई आणि बहीण विनला भेटण्यासाठी त्याठिकाणी पोहोचले; मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना मध्येच थांबवित पुढे जाऊ देण्यास सक्त मनाई केली. 



प्रकाश पादुकोन यांनी आपल्या पत्नी आणि मुलीसमवेत एका कोपºयात जात थोडा वेळ प्रतीक्षा केली; मात्र दीपिका आणि विन यांच्या मुलाखतींचा सिलसिला सुरूच असल्याने प्रकाश पादुकोन यांनी दीपिकाला फोन करून याबाबतची माहिती दिली. मग काय, दीपिकाने मुलाखत अर्ध्यावरच सोडत त्यांच्या दिशेने धूम ठोकली. त्यांना बघताच तिने वडील-आई आणि बहिणीला मिठी मारली. ही बाब विनलाही कळाली. विननेही दीपिकाचे पाठोपाठ जात तिच्या परिवाराची भेट केली. अचानकच घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ माध्यम प्रतिनिधीही चकित झाले. 



प्रकाश पादुकोन यांनी विनशी काही काळ गप्पा मारल्यानंतर त्यांना पुन्हा माध्यमांशी संवाद साधायला जाण्यास सांगितले; मात्र उपस्थितांमध्ये काही क्रीडाप्रेमी असल्याने त्यांनी प्रकाश पादुकोन यांना भेटण्याची संधी दवडली नाही. त्यांनी लगेचच त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विन डिझेल आणि दीपिकाच्या परिवाराची भेट अविस्मरणीय ठरली असेल यात शंका नाही. 

 

Web Title: Deepika's family queues up to meet Vin Diesel, something happened to Deepika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.