दीपिका म्हणते, चांगल्या मुलांवर माझा विश्वास नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 22:02 IST2016-07-09T16:32:48+5:302016-07-09T22:02:48+5:30
नुकतेच दीपिका पदुकोणने ‘xxx: द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेची झलक दाखवणारे पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटात ती आकर्षक अशा सेरेनाची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर एक वाक्य लिहिलेले आहे. चांगल्या मुलांवर माझा विश्वास नाही (I don’t believe in good guys) अशी ओळ दीपिकाच्या स्केचसोबत लिहण्यात आलेली आहे.

दीपिका म्हणते, चांगल्या मुलांवर माझा विश्वास नाही
द पिका पदुकोण लवकरच विन डिसेलसोबत ‘xxx: द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ या चित्रपटाद्वारे हॉलीवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण करेल. तिच्या पहिल्यावहिल्या हॉलिवूडपटाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. चित्रपटाच्या शूटींग दरम्यानचे दीपिकाने शेअर केलेले काही फोटो पाहून या चित्रपटाबद्दलची उत्सूकता चांगलीच वाढली आहे. नुकतेच दीपिका पदुकोणने ‘xxx: द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेची झलक दाखवणारे पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटात ती आकर्षक अशा सेरेनाची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर एक वाक्य लिहिलेले आहे. चांगल्या मुलांवर माझा विश्वास नाही (I don’t believe in good guys) अशी ओळ दीपिकाच्या स्केचसोबत लिहण्यात आलेली आहे. ‘xxx: द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’मध्ये दीपिका विन डिझेलसोबत रोमान्स करताना दिसणार असून ती यात काही अॅक्शन सीनदेखील करणार आहे. डिझेल व्यतिरीक्त दीपिका निना डॉब्रेव, डॉनी येन, टॉनी जा यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. ‘xxx: द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ हा चित्रपट पुढील वर्षी १७ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.