दीपिका-प्रियंकाने घेतले चार मिनिटांसाठी १.३ कोटी रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 11:24 IST2016-06-24T05:54:53+5:302016-06-24T11:24:53+5:30

हॉलीवूडमध्ये काम केल्यापासून दीपिका आणि प्रियंका चोपडाचा भाव चांगलाच वधारलेला दिसतोय. आता हेच पाहा ना, या दोघी लीडिंग लेडीज्ने ...

Deepika-Priyanka took 1.3 million rupees for four minutes! | दीपिका-प्रियंकाने घेतले चार मिनिटांसाठी १.३ कोटी रुपये!

दीपिका-प्रियंकाने घेतले चार मिनिटांसाठी १.३ कोटी रुपये!

लीवूडमध्ये काम केल्यापासून दीपिका आणि प्रियंका चोपडाचा भाव चांगलाच वधारलेला दिसतोय.

आता हेच पाहा ना, या दोघी लीडिंग लेडीज्ने आयफा अ‍ॅवॉर्ड शोमध्ये स्टेजवर केवळ चार मिनिटे परफॉर्म करण्यासाठी आयोजकांकडून तब्बल १.३ कोटी रुपये घेतले आहेत.

साधारणत: बॉलीवूड अ‍ॅक्ट्रेसना अशा प्रकारे एखाद्या सोहळ्यासाठी ७० ते ८० लाख रुपये मिळतात.

मात्र दीपिका आणि प्रियंका दोघीदेखील आता हॉलीवूडमध्ये काम करत असल्यामुळे ‘इंटरनॅशनल स्टार’ म्हणून त्यांच्या मानधानामध्ये कमालीची वाढ झाली आहे.

दीपिकाने तिच्या डान्स परफॉर्मन्ससाठी आयोजकांना एका मिनिटाला ३३ लाख रुपये चार्ज केले. प्रियंकानेदेखील तेवढेच पैसे घेतले. हे पाहता आता इंटरटेनमेंंट इंडस्ट्रीमध्ये नायिकांचा प्रभाव वाढतोय असे म्हणने वावगे ठरू नये.

पण ही रक्कम जरी खूप जास्त वाटत असली तरी बॉलीवूड हीरोंच्या तुलनेत कमीच आहे. शाहरुख, सलमान, हृतिक एका डान्स परफॉर्मन्ससाठी चार ते पाच कोटी घेतात.

Web Title: Deepika-Priyanka took 1.3 million rupees for four minutes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.