हॉलिवूडच्या 'टॉप अभिनेत्री 2018'च्या लिस्टमध्ये दीपिका पादुकोणने पटकावले स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 13:22 IST2018-02-10T07:51:45+5:302018-02-10T13:22:26+5:30

पद्मावत चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड प्रस्थापित करत असतानाच दीपिकाच्या फॅन्ससाठी आणखीन एक खूशखूबर आहे. एक हॉलिवूड न्यूज वेबसाईटने ...

Deepika Padukone's position in Hollywood's 'Top Actress 2018' list | हॉलिवूडच्या 'टॉप अभिनेत्री 2018'च्या लिस्टमध्ये दीपिका पादुकोणने पटकावले स्थान

हॉलिवूडच्या 'टॉप अभिनेत्री 2018'च्या लिस्टमध्ये दीपिका पादुकोणने पटकावले स्थान

्मावत चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड प्रस्थापित करत असतानाच दीपिकाच्या फॅन्ससाठी आणखीन एक खूशखूबर आहे. एक हॉलिवूड न्यूज वेबसाईटने दीपिकाला जगातल्या टॉप एक्टर्स 2018च्या लिस्ट मध्ये सामील केले आहे.आर्श्चयाची गोष्ट म्हणजे या लिस्टच्या पहिल्या 3 नावांमध्ये प्रियांका चोप्राचे नाव नाही आहे.  

वर्ल्डच्या टॉप एक्टर्सच्या लिस्टमध्ये दीपिकाने तिसरे स्थान पटाकवले आहे. या यादीत ड्वेन जॉनसन आणि केविन हार्ट पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. या लिस्टमध्ये अभिनेत्रींची निवड त्यांची पॉप्युलारिटी, सोशल मीडिया - फेसबूक, ट्विटर यावरुन त्यांचे फॅन फॉलोविंगची संख्या लक्षात घेऊन करण्यात आली आहे. याशिवाय आणखीन एकबाब लक्षात घेण्यात आली आहे ती म्हणजे दर आठवड्याला यांच्या फॅन्सच्या संख्येत किती वाढ होते याची आणि किती लोक त्यांचे अकाऊंट सब्सक्राइब करतात.   

दीपिका पादुकोणला हॉलिवूड अभिनेता जेम्स फ्रॅण्कोसोबत काम करण्याची इच्छा आहे. नेहा धुपियाच्या शोमध्ये त्यांने ही इच्छा व्यक्त केली. ३९ वर्षीय जेम्स फ्रॅण्को याच्यावर बºयाचशा महिलांनी शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. 

ALSO READ :  Shocking: दीपिका पादुकोणच्या एक्स बॉयफ्रेंडला डेट करायची इच्छा आहे तिच्या लहान बहिणाची..

सध्या बॉलिवूडमध्ये दीपिका आणि रणवीर सिंगच्या लग्नाची चर्चा आहे. विराट कोहली व अनुष्का शर्मासारखेच हे दोघेही डेस्टिनेशन वेडिंग करण्याच्या विचारात आहेत.  या डेस्टिनेशन वेडिंगची सध्या जोरात चर्चा आहे. पण रणवीर व दीपिका दोघांनाही समुद्र किनारा खूप आवडतो.  सूत्रांच्या मते, लग्नानंतर दोन रिसेप्शन होतील. दीपिकाचे कुटुंब बेंगळुरूत राहते. त्यामुळे दीपिकाच्या नातेवाईकांसाठी एक रिसेप्शन बेंगळुरूत होईल.तर रणवीरचे नातेवाईक व बॉलिवूडच्या मित्रांसाठी दुसरे रिसेप्शन मुंबईत दिले जाईल. विराट व अनुष्काने आपल्या लग्नासाठी इटलीची निवड केली होती. आता दीपिका व रणवीर कुठल्या देशाची व ठिकाणाची निवड करतात, ते बघूच. यापूर्वी दीपिका व रणवीरच्या अतिशय जवळच्या सूत्रांच्या हवाल्याने दीपिका व रणवीरने लग्नाचा निर्णय घेतला असल्याची बातमी आली होती. दीपिका व रणवीर दोघेही ‘पद्मावत’च्या रिलीजच्या प्रतीक्षेत होते. आता बघूया चित्रपटाच्या रिलीजनंतर ते आपल्या फॅन्सना ही खूषखबर देतायेत. 

Web Title: Deepika Padukone's position in Hollywood's 'Top Actress 2018' list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.