५०० कोटींच्या सिनेमात रजनीकांतबरोबर नाव असलेल्या दीपिका पादुकोणचा पत्ता कट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2017 18:34 IST2017-03-18T13:04:31+5:302017-03-18T18:34:31+5:30

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि साउथ सुपरस्टार रजनीकांत ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता आहे. रजनीकांतचा जावई ...

Deepika Padukone's address cut with Rajinikanth in the 500 crores movie? | ५०० कोटींच्या सिनेमात रजनीकांतबरोबर नाव असलेल्या दीपिका पादुकोणचा पत्ता कट?

५०० कोटींच्या सिनेमात रजनीकांतबरोबर नाव असलेल्या दीपिका पादुकोणचा पत्ता कट?

लिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि साउथ सुपरस्टार रजनीकांत ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता आहे. रजनीकांतचा जावई धनुष या दोघांना एकत्र घेऊन सिनेमा बनविण्याचा विचार करीत आहे. जर असे झाल्यास दीपिकाच्या खात्यात ५०० कोटी रुपयांच्या सिनेमाची भर पडेल यात शंका नाही; मात्र या दोघांना पुन्हा एकत्र आणण्याच्या प्रयत्नांमध्ये विघ्न आले असून, सिनेमात दीपिकाच्या एंट्रीबाबत साशंकता आहे. 

एका रिपोर्टनुसार, धनुष एका अशा सिनेमाची निर्मिती करण्याचा विचार करीत आहे, ज्याची कथा मुंबईच्या अवतीभोवती फिरते. वास्तविक या सिनेमासाठी पहिली पसंती दीपिका नसून विद्या बालन असल्याची माहिती पुढे आली होती; मात्र काही कारणास्तव विद्याऐवजी दीपिकाचे नाव पुढे आल्याने, तिला पुन्हा एकदा रजनीकांत यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळू शकते. 



असेही बोलले जात आहे की, हा सिनेमा रजनीकांत यांच्या ‘कबाली’ या सिनेमाशी संबंधित आहे. ‘कबाली’मध्ये रजनीकांतसोबत अभिनेत्री राधिका आपटे हिने भूमिका साकारली होती. दीपिकाविषयी बोलायचे झाल्यास तिने यापूर्वीच रजनीकांत यांच्याबरोबर ‘कोचडीयान’ या सिनेमात काम केले आहे. त्यामुळे तिची या सिनेमासाठी वर्णी लागू शकते; मात्र ‘कबाली’चे दिग्दर्शक पा. रंजित यांनी दीपिकाच्या नावाविषयी अफवा असल्याचे म्हटले आहे. ट्विटरवर त्यांच्या फॅन्सशी बोलताना त्यांनी म्हटले की, दीपिकाचे नाव निव्वळ अफवा आहे. त्यामुळे दीपिका या सिनेमात रजनीकांत यांच्याबरोबर दिसणार काय? याविषयी सस्पेन्स निर्माण झाला आहे. 

दरम्यान, रजनीकांत त्यांच्या ‘२.०’ च्या अंतिम शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या सिनेमात रजनीकांत याच्याबरोबर अक्षय कुमार आणि एमी जॅक्सन दिसणार आहेत. हा सिनेमा रजनीकांत यांच्या सुपरहिट ‘रोबोट’चा सीक्वल आहे. सिनेमात अक्षय कुमार खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रिलिज होण्याची शक्यता आहे. 

Web Title: Deepika Padukone's address cut with Rajinikanth in the 500 crores movie?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.