दीपिका पादुकोणने परिवाराशी कनेक्ट राहण्यासाठी घेतला ‘व्हॉट्सअ‍ॅप’चा आधार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 22:29 IST2017-03-15T16:59:42+5:302017-03-15T22:29:42+5:30

कलाकारांचे शेड्यूल्ड किती बिझी असते, हे त्यांच्या परिवारातील लोकच चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. कारण शूटिंगनिमित्त त्यांना नेहमीच परिवारापासून दूर ...

Deepika Padukone took to stay connected with her family! | दीपिका पादुकोणने परिवाराशी कनेक्ट राहण्यासाठी घेतला ‘व्हॉट्सअ‍ॅप’चा आधार!

दीपिका पादुकोणने परिवाराशी कनेक्ट राहण्यासाठी घेतला ‘व्हॉट्सअ‍ॅप’चा आधार!

ाकारांचे शेड्यूल्ड किती बिझी असते, हे त्यांच्या परिवारातील लोकच चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. कारण शूटिंगनिमित्त त्यांना नेहमीच परिवारापासून दूर राहावे लागत असून, कित्येक दिवस त्यांच्याशी फोनवर संपर्क ठेवणेदेखील मुश्कील होत असते. अशात बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण हिने परिवाराशी कनेक्ट राहण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा आधार घेतला आहे. ती व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आपल्या परिवाराशी कनेक्ट राहत असते. 

बॉलिवूडमधील सर्वाधिक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाºया दीपिकाला शूटिंगनिमित्त सर्वाधिक प्रवास करावा लागतो. त्यामुळे तिला परिवारातील सदस्यांशी संपर्क साधणे खूपच मुश्कील होते. दीपिका ही मूळची बेंगळुरू येथील असून, तिचा संपूर्ण परिवार तिथेच राहतो. दीपिका एकटी मुंबई येथे राहत असल्याने परिवाराशी तिचा कित्येक दिवस संपर्क होत नाही; मात्र ती व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने सातत्याने परिवाराशी कनेक्ट असते. यासाठी दीपिकाने एक फॅमिली गु्रप तयार केला असून, त्यातून ती घराच्यांशी संवाद साधत असते. 



दीपिकासारखीच स्थिती वरुण धवन याचीदेखील आहे. सिनेमाच्या शूटिंगच्या व्यस्ततेमुळे त्याला परिवार तसेच मित्रांशी बोलणे शक्य होत नाही. त्यामुळे तो आई-वडील तसेच बहीण अनिशासोबत व्हॉट्सअ‍ॅपवरच बोलत असतो. त्यामुळे त्याला परिवारात काय घटना, घडामोडी घडत आहेत याची सहज माहिती मिळते. सध्या वरुणचे करिअर यशाच्या वाटचालीवर असल्याने त्याला सिनेमाच्या एकापाठोपाठ एक आॅफर्स मिळत आहेत. 

दर दीपिका बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही नशीब आजमावत असल्याने तिला बाहेर देशात भ्रमंती करावी लागत आहे. दीपिकाचा ‘एक्सएक्सएक्स : रिटर्न आॅफ जेंडर केज’ हा सिनेमा नुकताच रिलिज झाला असून, जगभरात या सिनेमाने चांगला गल्ला जमविला आहे. त्याचबरोबर दीपिकाला आंतरराष्ट्रीय स्टारचा दर्जाही मिळवून दिला आहे. 

Web Title: Deepika Padukone took to stay connected with her family!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.