...अन् दीपिका पादुकोणला सेटवरच रडू कोसळले!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2017 21:21 IST2017-05-02T15:08:48+5:302017-05-02T21:21:31+5:30

बॉलिवूडची मस्तानी अर्थात दीपिका पादुकोण खूपच हळव्या मनाची आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. याचा प्रत्यय तेव्हा आला जेव्हा ...

Deepika Padukone sheds light on the set !! | ...अन् दीपिका पादुकोणला सेटवरच रडू कोसळले!!

...अन् दीपिका पादुकोणला सेटवरच रडू कोसळले!!

लिवूडची मस्तानी अर्थात दीपिका पादुकोण खूपच हळव्या मनाची आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. याचा प्रत्यय तेव्हा आला जेव्हा तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ऐनवेळी तिचे संवाद बदलण्यात आले होते. त्यामुळे तिला सेटवरच रडू कोसळले. दीपिकाचा हा हळवेपणा इतरांना बुचकळ्यात टाकणारा होता. काही वेळानंतर दीपिकाने तिच्या भावना आवरत शूटिंग पूर्ण केली. 

त्याचे झाले असे की, ‘गोलियों की रासलीला रामलीला’ या चित्रपटाची कथा सिद्धार्थ सिंग यांच्यासोबत लिहिणाºया गरिमा बहल यांनी सांगितले की, दीपिका पादुकोण हिचे डायलॉग ऐनवेळी बदलल्याने तिला रडायला आले होते. गरिमा यांनी २०१३ च्या आठवणींना उजाळा देताना हा प्रसंग सांगितला. दरम्यान याविषयी सिद्धार्थनेदेखील आपले मत व्यक्त  केले. त्यांनी सांगितले की, ‘सर्वसामान्यपणे कलाकार आम्ही लिहिलेले संवाद सहज बोलतात. आम्ही यात सुटसुटीतपणा आणण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे आम्ही शूटिंगला सुरुवात करण्याअगोदर चित्रपटाची पटकथा अगोदर कलाकारांना ऐकवितो. 



दरम्यान गरिमाने सांगितले की, एक दिवसाच्या शूटिंगसाठी मी दीपिकासोबत सेटवर होतो; मात्र ऐनवेळी दीपिकाचे संवाद बदलले गेल्याने ती खूपच हतबल झाली होती. असे खूपच कमी वेळा बघावयास मिळते की, दीपिका अशाप्रकारे भावनाविवश होते. कारण दीपिका तिच्या डायलॉगचे खूप चांगल्या पद्धतीने स्मरण करते. त्यामुळे दीपिकाचे रडणे बघून सगळ्यांनाच टेन्शन आले होते. बराच वेळ शूटिंग थांबविल्यानंतर दीपिका शांत झाली अन् तिने संवाद पुन्हा पाठ करून शूटिंगला सुरुवात केली. 

सिद्धार्थ सिंग आणि गरिमा बहल यांनी सुशांत सिंग राजपूत आणि क्रिती सॅनन यांच्या आगामी ‘राब्ता’ या चित्रपटाची कथा लिहिली असून, सध्या या दोघांना या चित्रपटाच्या रिलीजची प्रतीक्षा आहे. चित्रपटाचे ट्रेलर खूपच गाजत असून, दोन जन्मावर आधारित चित्रपटाची कथा आहे. 

Web Title: Deepika Padukone sheds light on the set !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.