Pathaan: सोशल मीडियावरचा ‘पठाण’चा व्हायरल ‘ट्रेलर’ पाहून क्रेझी झालेत फॅन्स, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 12:41 PM2023-01-03T12:41:59+5:302023-01-03T13:26:43+5:30

Pathaan Trailer : ‘पठाण’चा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. अर्थात हा ‘पठाण’चा ऑफिशिअल ट्रेलर नसून एका फॅनने बनवलेला आहे.  

Deepika Padukone Shahrukh Khan Fan Made Pathaan Trailer Viral On Social Media | Pathaan: सोशल मीडियावरचा ‘पठाण’चा व्हायरल ‘ट्रेलर’ पाहून क्रेझी झालेत फॅन्स, म्हणाले...

Pathaan: सोशल मीडियावरचा ‘पठाण’चा व्हायरल ‘ट्रेलर’ पाहून क्रेझी झालेत फॅन्स, म्हणाले...

googlenewsNext

शाहरूख खानचा ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा रिलीजआधीच चर्चेत आहे. चित्रपटातील शाहरूख (Shahrukh Khan) व दीपिकाची (Deepika Padukone ) रोमॅन्टिक केमिस्ट्री पाहून चाहते क्रेझी झाले आहेत. ‘बेशरम रंग’ या गाण्यात याची झलक सगळ्यांनी पाहिलीच. आता ‘पठाण’चा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. अर्थात हा ‘पठाण’चा ऑफिशिअल ट्रेलर नसून एका फॅनने बनवलेला आहे.  
गेल्या अनेक दिवसांपासून चाहते ‘पठाण’च्या ट्रेलरची प्रतीक्षा करत आहेत. अशात एका चाहत्याने एडिट ट्रेलर इंटरनेटवर शेअर केला आणि तो क्षणात व्हायरल झाला. ट्रेलरमध्ये दीपिका पादुकोण, शाहरूख, जॉन अब्राहम बघायला मिळत आहेत. या फॅन मेड ट्रेलरवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. 

‘पठाण’ या चित्रपटाद्वारे शाहरूखचं चार वर्षानंतर कमबॅक होतेय. या अ‍ॅक्शन पॅक्ड सिनेमात एसआरकेचा एक वेगळा अवतार पाहायला मिळत आहे. सध्या या सिनेमाचं जबरदस्त प्रमोशन सुरू आहे.  ट्रेलरआधीच या चित्रपटाचं ‘बेशरम रंग’ हे सर्वात हॉट गाणं लॉन्च करण्यात आलं. या गाण्यात दीपिका कधी नव्हे इतक्या बोल्ड लुकमध्ये दिसली. तिच्या भगव्या बिकिनीने वाद ओढवून घेतला. यावरून  वातावरण तापलं असतानाच   ‘पठाण’चं दुसरं गाणं ‘झुमे जो पठान’ आऊट झालं.

‘पठाण’ चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या  25 जानेवारी 2023 रोजी रिलीज होत आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘पठाण’नंतर शाहरूखचे एकापाठोपाठ एक दोन सिनेमे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ‘जवान’ या सिनेमात तो दिसणार आहे. यात नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा हेही मुख्य भूमिकेत आहे. राजकुमार हिरानींच्या ‘डंकी’ या चित्रपटातही शाहरूखची वर्णी लागली आहे.

Web Title: Deepika Padukone Shahrukh Khan Fan Made Pathaan Trailer Viral On Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.