आईसोबत दागिणे खरेदी करताना दिसली दीपिका पादुकोण; ही ‘वेडिंग शॉपिंग’ तर नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 12:58 IST2018-06-07T07:28:23+5:302018-06-07T12:58:23+5:30

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे लव्हबर्ड्स लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार, अशी चर्चा आहे. सध्या बॉलिवूडमध्ये याचीच एक चर्चा ...

Deepika Padukone seen wearing jewels; If not this 'shopping shopping'? | आईसोबत दागिणे खरेदी करताना दिसली दीपिका पादुकोण; ही ‘वेडिंग शॉपिंग’ तर नाही?

आईसोबत दागिणे खरेदी करताना दिसली दीपिका पादुकोण; ही ‘वेडिंग शॉपिंग’ तर नाही?

पिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे लव्हबर्ड्स लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार, अशी चर्चा आहे. सध्या बॉलिवूडमध्ये याचीच एक चर्चा आहे. दोघांच्या लग्नाबद्दल, लग्नाच्या तारखेबद्दल इतकेच काय तर लग्न कुठे होईल, कसे होईल, याबद्दल वेगवेगळ्या बातम्या कानावर येत आहे़. अर्थात या बातम्यांना तसा आधारही आहे. ताज्या घडामोडीनुसार, दीपिका तिच्या आईसोबत दागिण्यांची शॉपिंग करताना दिसली आणि पुन्हा दीपिका व रणवीरच्या लग्नाच्या बातम्यांना जोर चढला.



आई उज्ज्वलासोबत दीपिका मुंबईच्या एका ज्वेलरी शॉपमध्ये खरेदी करताना दिसली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या शॉपमध्ये दीपिकाने काही दागिण्यांची खरेदी केली.



शॉपमधून निघतानाचे दीपिकाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये दीपिका अतिशय आनंदी दिसतेय. आता दीपिकाच्या चेह-यावरचा हा आनंद कसला, हे तिलाच ठाऊक? या आनंदाचे कारण दीपिकाने लवकरात लवकर जाहीर करावे, केवळ एवढेचं आपण म्हणू!



स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, दीपिका आणि रणवीरचे लग्न 18 ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान होणार आहे.  लग्नाच्या तयारीत कसू भरही कसल्याच गोष्टीची कमी पडू नये यासाठी दीपिकाच्या टीममधील प्रत्येकाला नोव्हेंबरमध्ये एकही सुट्टी घ्यायची नाही अशी ताकिद देण्यात आली आहे. दीपिकाच्या मेकअप आर्टिस्ट पासून ते मॅनेजरपर्यंत सगळ्यांना लग्नादरम्यान हजर राहण्याचे आदेश आहेत. अजून दीपिकाच्या पीआर टीमकडून याबाबत कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.  

ALSO READ :   हॉलिवूड चित्रपटाला बॉलिवूड डान्सचा तडका! दीपिका पादुकोण करणार ‘लुंगी डान्स’!!

दीपिका व रणवीर या दोघांनाही डेस्टिनेशन वेडिंग हवे आहे. रणवीर व दीपिका दोघांनाही समुद्र किनारा खूप आवडतो. त्यामुळे लग्नासाठी बीच वेडिंगचा पर्याय निवडला होता. पण त्यांच्या कुटुंबाना मात्र हे मान्य नाही. त्यामुळे हे लग्न मुंबईतचं होण्याची शक्यता अधिक आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार जवळपास सगळचे नातेवाईक मुंबईत आहेत.  डेस्टिनेशन वेडिंग केल्यास त्यांना सहभागी होता येणार नाही.   

Web Title: Deepika Padukone seen wearing jewels; If not this 'shopping shopping'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.