आमीर खानच्या सिनेमात काम करण्यास दीपिका पादुकोणने दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 08:00 AM2018-12-08T08:00:00+5:302018-12-08T08:00:00+5:30

दीपिका पादुकोणने आमीर खानच्या चित्रपटात काम करण्यास नकार का दिल्याचे अद्याप समजू शकलेले नाही.

Deepika Padukone refuses to work in Aamir Khan's movie | आमीर खानच्या सिनेमात काम करण्यास दीपिका पादुकोणने दिला नकार

आमीर खानच्या सिनेमात काम करण्यास दीपिका पादुकोणने दिला नकार

googlenewsNext
ठळक मुद्दे 'महाभारत'मध्ये काम करण्यास दीपिकाने दिला नकार

दीपिका पादुकोण बॉलिवूडमधील सर्वात टॅलेंटेड अभिनेत्रीपैकी एक आहे. 'पीकू', 'पद्मावत' आणि 'तमाशा' सारख्या चित्रपटात दीपिकाने अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर आपली छाप उमटविली आहे. कित्येक प्रोडक्शन हाऊस दीपिकाला पहिले प्राधान्य असते. सूत्रांच्या माहितीनुसार, दीपिका पादुकोणने बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे.

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, आमीर खान प्रोडक्शनचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'महाभारत'साठी दीपिका पादुकोणला विचारण्यात आले होते. आमीरला या सिनेमातील द्रौपदीच्या भूमिकेसाठी दीपिकाला घ्यायचे होते. मात्र दीपिकाने चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याचे समजते आहे. दीपिकाने नकार का दिल्याचे अद्याप समजू शकलेले नाही. 
दीपिका पादुकोण लवकरच एका बायोपिकमध्ये झळकणार आहे. ती अॅसिड अॅटॅकमधून वाचलेली लक्ष्मीच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आगे. तिने एका मुलाखतीत सांगितले की, लक्ष्मीच्या कहाणी मला खूप भावली आहे. दीपिका या बायोपिकमध्ये फक्त मुख्य भूमिका साकारणार नसून निर्मितीदेखील करणार आहे.


दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. गत १४-१५ नोव्हेंबरला दीपिका व रणवीरने इटलीतील सुप्रसिद्ध लेक कोमो येथे लग्नगाठ बांधली होती. सिंधी आणि कोंकणी अशा दोन्ही पद्धतीने त्यांनी लग्न केले. इटलीमध्ये लग्न केल्यानंतर दीपवीरने बेंगळुरु आणि मुंबईत दोन ठिकाणी लग्नाचे रिसेप्शन दिले. रिसेप्शन पार्टी संपल्यानंतर दोघे आपआपल्या कामात व्यस्त झाले आहेत. रणवीर सिंगचा सिम्बा 28 डिसेंबरला रिलीज होणार आहे. यात त्याच्या अपोझिट सारा अली खान दिसणार आहे तर दीपिकाची वर्णी करण जोहरच्या दोस्ताना 2 मध्ये लागल्याची चर्चा आहे. 

Web Title: Deepika Padukone refuses to work in Aamir Khan's movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.