'धूम ४'मध्ये व्हिलनच्या भूमिकेत दिसणार दीपिका पादुकोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 20:03 IST2021-02-12T20:02:52+5:302021-02-12T20:03:27+5:30
अभिनेत्री दीपिका पादुकोण 'धूम ४'मध्ये दिसणार आहे.

'धूम ४'मध्ये व्हिलनच्या भूमिकेत दिसणार दीपिका पादुकोण?
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण 'धूम ४'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या कामाला सुरूवात झाली आहे. आता असे समजते आहे की दीपिका पादुकोण या चित्रपटात व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार चित्रपटांच्या निर्मात्यांनी दीपिका पादुकोणसोबत संपर्क साधला आहे आणि दीपिकादेखील या चित्रपटात काम करण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दीपिकाला हा चित्रपट साइन करण्याआधी तिच्या तारखा सांभाळाव्या लागतील. सध्या दीपिकाचे वेळापत्रक व्यस्त आहे. दीपिका शाहरुख खानसोबत पठाण चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.
रिपोर्टनुसार जॉन अब्राहम पठाण या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यापूर्वी शाहरुख आणि दीपिकाची जोडी 'ओम शांती ओम' चेन्नई एक्सप्रेस आणि हॅपी न्यू इयरमध्ये दिसली होती, ही जोडी चाहत्यांनी खूप आवडली होते. दीपिका पादुकोण सध्या शकुन बत्राच्या सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्या पुढच्या चित्रपटाची शूटिंग करत आहे. अलीकडेच दीपिकाने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तिने ओन्ली लव्ह लिहिले होते, दीपिकाच्या आगामी चित्रपटाचे शीर्षक असण्याची शक्यता वर्तवण्यात जात आहे.
याशिवाय यावर्षी दीपिका बाहुबली फेम प्रभाससोबतही दिसणार आहे. ऋतिक रोशनसोबत ‘फायटर’ या चित्रपटातही ती झळकणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत.