दीपिका पादुकोण पुन्हा जाणार हॉलिवूडला! वाचा संपूर्ण बातमी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 16:39 IST2017-11-03T11:09:00+5:302017-11-03T16:39:00+5:30
सध्या दीपिका पादुकोण ‘पद्मावती’त बिझी आहे. याचदरम्यान दीपिकाच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. होय, दीपिका पुन्हा एकदा हॉलिवूडला ...

दीपिका पादुकोण पुन्हा जाणार हॉलिवूडला! वाचा संपूर्ण बातमी!!
स ्या दीपिका पादुकोण ‘पद्मावती’त बिझी आहे. याचदरम्यान दीपिकाच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. होय, दीपिका पुन्हा एकदा हॉलिवूडला निघण्याच्या तयारीत आहे. याचवर्षी दीपिकाचा पहिला-वहिला हॉलिवूडपट रिलीज झालाय. यंदा ‘एक्सएक्सएक्स : रिटर्न आॅफ जेंडर केज’द्वारे तिने हॉलिवूड डेब्यू केला होता. याच चित्रपटाच्या सीक्वलमध्ये पुन्हा एकदा दीपिकाची वर्णी लागल्याची खबर आहे. होय, म्हणजेच दीपिका पुन्हा एकदा विन डिजलसोबत दिसणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी या चित्रपटातील दीपिकाची भूमिका आधीपेक्षा अधिक दमदार व मोठी असणार आहे.
ट्रेड एक्सपर्ट रमेश बाला यांनी त्यांच्या सोशल अकाऊंटवरून याची माहिती दिली आहे. ‘एक्सएक्सएक्स : रिटर्न आॅफ जेंडर केज’मध्ये दीपिकाने सेरेना उंगरची व्यक्तिरेखा साकारली होती. अर्थात या चित्रपटाने फार मोठी कमाई केली नव्हती. पण यातील दीपिकाच्या कामाचे मात्र प्रचंड कौतुक झाले होते. केवळ दीपिकाचीच नाही तर चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्टच्या कामाची प्रशंसा झाली होती. त्यामुळे ‘एक्सएक्सएक्स : रिटर्न आॅफ जेंडर केज’च्या सीक्वलमध्येही संपूर्ण स्टारकास्ट रिपीट करण्यात येणार आहे. एकंदर काय तर लवकरच दीपिका आपल्या दुसºया हॉलिवूड चित्रपटाच्या तयारीला लागणार आहे.
ALSO READ: ‘बाहुबली2’ व ‘दंगल’ला मागे टाकत ‘पद्मावती’ रचणार एक अनोखा विक्रम!!
दीपिकाचा ‘पद्मावती’ हा चित्रपट येत्या १ डिसेंबरला रिलीज होतोय. या चित्रपटात दीपिकाने राणी पद्मावतीची ऐतिहासिक व्यक्तिरेखा जिवंत केली आहे. या चित्रपटाकडून केवळ दीपिकालाच नाही तर तमाम सिनेप्रेमींनाही मोठ्या अपेक्षा आहेत. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’मध्ये दीपिकाशिवाय रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्याही मुख्य भूमिका आहेत.भारतात एकूण ४५०० स्क्रीन्सवर ‘पद्मावती’ रिलीज केला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर याच्या वितरणाची जबाबदारी हॉलिवूडच्या नावाजलेल्या ‘पॅरामाऊंट पिक्चर्स’ या स्टुडिओला देण्यात आली आहे. चर्चा खरी मानाल तर मेकर्सने ‘पद्मावती’ तब्बल १५० देशांत रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय प्रत्यक्षात अमलात आल्यास हा एक मोठा विक्रम असेल. असे झालेच तर ‘पद्मावती’ हा ‘बाहुबली2’ आणि ‘दंगल’पेक्षाही यशस्वी ठरेल.