​दीपिका पादुकोणला मिळाली हॉलिवूडची मोठ्ठी आॅफर...मग काय झाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 11:20 IST2017-08-21T05:50:57+5:302017-08-21T11:20:57+5:30

दीपिका पादुकोण यावर्षीच्या प्रारंभी हॉलिवूडमध्ये दिसली. ‘ट्रिपल एक्स : रिटर्न आॅफ जेंडर केज’ या दीपिकाच्या पहिल्या-वहिल्या हॉलिवूडपटाची बरीच चर्चा ...

Deepika Padukone gets Hollywood's biggest offer ... So what happened? | ​दीपिका पादुकोणला मिळाली हॉलिवूडची मोठ्ठी आॅफर...मग काय झाले?

​दीपिका पादुकोणला मिळाली हॉलिवूडची मोठ्ठी आॅफर...मग काय झाले?

पिका पादुकोण यावर्षीच्या प्रारंभी हॉलिवूडमध्ये दिसली. ‘ट्रिपल एक्स : रिटर्न आॅफ जेंडर केज’ या दीपिकाच्या पहिल्या-वहिल्या हॉलिवूडपटाची बरीच चर्चा झाली. या चित्रपटानंतर हॉलिवूडमधील काही मेकर्स दीपिकाला आपल्या  चित्रपटात घेण्यास उत्सूक असल्याचे कळतेय. हॉलिवूडच्या एका मोठ्या स्टुडिओने, अशीच एक आॅफर घेऊन दीपिकाशी अलीकडे संपर्क साधला. बॅनर मोठे होते, यात दीपिकाला देऊ केलेली भूमिकाही दमदार होती, चित्रपटाची स्टारकास्टही मोठी होती. पण तरिही डीपीने म्हणे या चित्रपटाला नकार दिला. आता या नकारामागचे कारण तर शोधायलाच हवेच. सध्या बॉलिवूडमधील चर्चा ऐकाल तर, पैशावरून ही चर्चा फिस्कटल्याचे कळतेय. दीपिकाची डिमांड मोठी होती. अन् हॉलिवूड मेकर्सला ही मोठ्ठी डिमांड मान्य नव्हती. शेवटी काहीच तोडगा निघू न शकल्याने दीपिकाने म्हणे, चित्रपटाला नकार कळवला.

ALSO READ : दीपिका पादुकोणच्या या नव्या लूकबद्दल तुम्ही काय म्हणाल?

अर्थात दीपिकाच्या गोटातून मात्र वेगळीच कथा ऐकवली जाते. दीपिका या हॉलिवूड प्रोजेक्टबद्दल कमालीची उत्सूक होती. या बॅनरसोबत काम करण्याची तिची मनापासून इच्छा होती. मात्र दीपिकाला या रोमॅन्टिक- ड्रामाला नकार द्यावा लागला. कारण हॉलिवूड मेकर्सला यावर्षीच हा चित्रपट सुरु करायचा होता. शिवाय या महिन्यापासूनच वर्कशॉप सुरु करायचा त्यांचा आग्रह होता. पण दीपिकाला हे शक्य नव्हते. कारण सध्या ती ‘पद्मावती’मध्ये बिझी आहे. तारखांचा मेळ जमत नसल्याने दीपिकाने म्हणे या हॉलिवूड प्रोजेक्टला नकार दिला. आता एवढी मोठी आॅफर नाकारल्याचा काही पश्चाताप? तर दीपिकाला याचा कुठलाच पश्चाताप नसल्याचे कळतेय. कारण ‘पद्मावती’वर म्हणे दीपिकाचा पूर्ण विश्वास आहे आणि बॉलिवूड हीच तिची प्राथमिकताही आहे.  

Web Title: Deepika Padukone gets Hollywood's biggest offer ... So what happened?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.