​ लग्नाच्या बातम्यांवर अखेर दीपिका पादुकोणने तोडली चुप्पी! जाणून घ्या बॉलिवूडच्या ‘मस्तानी’चे उत्तर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 12:26 IST2018-04-05T06:56:12+5:302018-04-05T12:26:12+5:30

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे बॉलिवूडचे सर्वाधिक लोकप्रीय कपल लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्या बातम्या सध्या जोरात आहेत. ...

Deepika Padukone finally broke the silence of marriage news! Learn more about Bollywood's 'Mastani' !! | ​ लग्नाच्या बातम्यांवर अखेर दीपिका पादुकोणने तोडली चुप्पी! जाणून घ्या बॉलिवूडच्या ‘मस्तानी’चे उत्तर!!

​ लग्नाच्या बातम्यांवर अखेर दीपिका पादुकोणने तोडली चुप्पी! जाणून घ्या बॉलिवूडच्या ‘मस्तानी’चे उत्तर!!

पिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे बॉलिवूडचे सर्वाधिक लोकप्रीय कपल लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्या बातम्या सध्या जोरात आहेत. यापूर्वी दीपिका तिच्या वाढदिवशी (५ जानेवारी) साखरपुडा करणार, अशी जोरदार अफवा पसरली होती. अखेर असे काहीही नसल्याचे दीपिकाला स्पष्ट करावे लागले होते. आता पुन्हा एकदा दीपिका व रणवीर या दोघांच्या लग्नाची चर्चा जोरात आहे. दीपिकाने या लग्नाची तयारी सुरू केल्याचेही सांगण्यात येत आहे. पण ताज्या मुलाखतीत, दीपिकाने पुन्हा एकदा या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. लग्नासाठी योग्य वेळ काय असेल, हे मला ठाऊक आहे. विवाहसंस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. लग्न, संसार हे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. माझेही आहे. पण माझे लग्न कधी होणार, मी त्यासाठी कधी तयार होईल, हे मला पक्के ठाऊक आहे.  लग्नाच्या अफवा मला जराही विचलित करत नाही. चारवेळा साखरपुडा आणि पाचव्यांदा लग्न हे सगळे आता अंगवळणी पडलेयं. तूर्तास मी लग्न करतेय, या बातमीत काहीही सत्यता नाहीय, असे दीपिकाने या मुलाखतीत स्पष्ट केले.

याआधीही दीपिकाने लग्न करणार असल्याचा इन्कार केला होता. सध्या माझे संपूर्ण लक्ष माझ्या कामावर आहे. कामाशिवाय माझ्या डोक्यात कुठलाही विचार नाही. अर्थात वेळ येईल तेव्हा मी लग्नाचा विचार करेल, असे दीपिका म्हणाली होती.

ALSO READ : करण जोहर आणि दीपिका पादुकोण 'या' प्रोजेक्टसाठी आले एकत्र!

अलीकडे दीपिका व रणवीरचा ‘पद्मावत’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने रेकॉर्ड तोड कमाई केली. ‘पद्मावत’नंतर दीपिका विशाल भारद्वाज यांच्या‘सपना दीदी’ या चित्रपटात दिसणार आहे. यात दीपिकाच्या अपोझिट इरफान खानचे नाव फायनल झाले होते. पण या चित्रपटाचे शूटींग सुरू होण्याआधीच इरफानच्या आजाराची बातमी आली. न्युरो इंडोक्राईन ट्युमर या दुर्धर आजाराने इरफानला ग्रासले आहे. सध्या विदेशात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे ‘सपना दीदी’चे शूटींग पुढे ढकलण्यात आले आहे.

Web Title: Deepika Padukone finally broke the silence of marriage news! Learn more about Bollywood's 'Mastani' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.