कन्फर्म या शहरात घेणार दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग सात फेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 12:16 IST2018-04-05T06:46:16+5:302018-04-05T12:16:16+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणच्या लग्नाची बी टाऊनमध्ये जोरदार चर्चा आहे. या जोडीने बॉलिवूडला बाजीराव ...

Deepika Padukone and Ranvir Singh will take seven rounds in Confirm city | कन्फर्म या शहरात घेणार दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग सात फेरे

कन्फर्म या शहरात घेणार दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग सात फेरे

ल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणच्या लग्नाची बी टाऊनमध्ये जोरदार चर्चा आहे. या जोडीने बॉलिवूडला बाजीराव मस्तानी, गोलियों की रासलीला राम लीला यांचा समावेश आहे. आजपर्यंत दोघांनी कधीच आपलं नातं स्वीकारले नाही मात्र मीडियासमोर नेहमीच हातात हात घालून एकत्र समोर आले.  

दोघे लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. सध्या रणवीर आणि दीपिकाचे कुटुंबीय लग्नाच्या तयारीला लागले आहेत. विराट व अनुष्काने आपल्या लग्नासाठी इटलीची निवड केली होती. त्यामुळे आता दीपिका व रणवीर कुठल्या देशाची निवड करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले  होते. सूत्रांच्या माहिती नुसार दोघांनी डेस्टिनेशन वेडिंगला पसंती दिली आहे आणि यासाठी त्यांनी स्वित्झर्लंडची निवड केली आहे. तुम्हाला सांगतो रणवीर सिंग हा स्वित्झर्लंडचा ब्रँड अॅम्बेसिडर आहे. त्यामुळे तिथल्या सरकारने त्यांना तिकडे लग्न करण्याचे आमंत्रण दिले आहे आणि रणवीरने ते स्वीकारले आहे. दीपिका व रणवीर या दोघांनी लग्नासाठी यावर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या महिन्यातील चार तारखा निश्चित केल्या आहेत. यापैकी एक तारीख अंतिमत: निश्चित करण्यात येईल. दीपिका व रणवीरचे लग्न एक खासगी सोहळा असेल. केवळ कुटुंबातील व्यक्ती आणि अतिशय जवळचे मित्र व नातेवाईक एवढेच या लग्नात असतील. काही दिवसांपूर्वी दीपिका आपल्या आईसोबत दागिण्यांची खरेदी करताना दिसली होती. 

ऐवढेच नाही तर लग्नानंतर दीपिका बॉलिवूडमधून संन्यास देखील घेऊ शकते. दीपिकाने नुकताच एका मुलाखतीत हा खुलासा केला. लग्नानंतर कदाचित मी अ‍ॅक्टिंग सोडून फॅमिली लाईफमध्ये बिझी होऊ शकते. माझ्यासाठी कुटुंबापेक्षा मोठे काहीही नाही. मला खूप सारी मुलं हवी आहेत. मला कुटुंबाचे महत्त्व ठाऊक आहे. कुटुंब तुमच्या आयुष्याला पूर्णत्व देते, असे दीपिका या मुलाखतीत म्हणाली. अर्थात लग्नाचा प्लान कधी आहे? हा प्रश्न मात्र  दीपिकाने चतुराईने टाळला. मला माहित नाही, मी लग्न कधी करेल. सध्या तरी अशी कुठलीही योजना नाही,असे दीपिका म्हणाली. 

Web Title: Deepika Padukone and Ranvir Singh will take seven rounds in Confirm city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.