दीपिका पादुकोण अन् रणवीर सिंहची ‘सीक्रेट डिनर डेट’ लीक !!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 11:33 IST2017-08-23T06:03:55+5:302017-08-23T11:33:55+5:30
दीपिका पादुकोण व रणवीर सिंह यांची लव्हस्टोरी सध्या चांगलीच बहरात आहे. होय, आमचे नाते अजिबात बदललेले नाही. आम्ही आजही ...

दीपिका पादुकोण अन् रणवीर सिंहची ‘सीक्रेट डिनर डेट’ लीक !!
द पिका पादुकोण व रणवीर सिंह यांची लव्हस्टोरी सध्या चांगलीच बहरात आहे. होय, आमचे नाते अजिबात बदललेले नाही. आम्ही आजही रिलेशनशिपमध्ये आहोत, हेच जणू दीपिका व रणवीर आपल्या चाहत्यांना सांगू इच्छित आहेत. कदाचित यासाठीच दोघेही अलीकडे अधिकाधिक वेळ सोबत घालवू लागले आहेत. कॅमेºयासमोर इंटिमेट होण्यापासून तर डिनर डेटपर्यंत असे सगळे सगळे एन्जॉय करू लागले आहेत. विशेष म्हणजे संजय लीला भन्साळी यांची ताकिद अव्हेरून हे सगळे सुरु आहे. (होय, ‘पद्मावती’ रिलीज होईपर्यंत मीडियासमोर एकत्र दिसता कामा नये, अशी ताकिद भन्साळींनी दीपिका व रणवीरला दिली आहे.) रोज दीपिका व रणवीरचे एकापेक्षा एक रोमॅन्टिक फोटो, व्हिडिओ समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी दोघांच्याही लाँग ड्राईव्हचा फोटो खूप व्हायरल झाला होता. यानंतर दोघे एकमेकांना किस करतानाचा फोटो गाजला. यानंतर एकमेकांना मिठीत घेत असतानाचा दोघांच्या व्हिडिओने इंटरनेटवर आग लावली. आता बातमी आहे, दोघांच्याही सीक्रेट डिनर डेटची.
![]()
ALSO READ : WATCH VIDEO : रणवीर सिंह व दीपिका पादुकोण झालेत रोमॅन्टिक! विसरले जगाचे भान!!
होय, लॅक्मे फॅशन वीकनंतर रणवीरने दीपिकाला तिच्या घरून पिक केले. यानंतर दोघेही एका सीक्रेट डिनर डेटवर गेलेत. ही डिनर डेट दोघांनीही मस्त एन्जॉय गेली. यानंतर हे लव्हबर्ड्स रितेश सिधवानी यांच्या पार्टीत गेलेत. रितेशच्या पार्टीत हजर असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, दीपिका व रणवीर दोघेही पार्टीत आले तसे सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. संपूर्ण पार्टीत दोघेही एकमेकांसोबत होते. एका क्षणासाठी दोघांनी एकमेकांना सोडले नाही. एकंदर काय तर, दीपिका व रणवीर दोघेही एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडालेत, हेच यावरून दिसते.