दीपिकाने केलाय मानसिक आजाराचा सामना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 13:07 IST2016-10-12T12:10:02+5:302016-10-17T13:07:13+5:30
मानसिक आजारातून गेले असल्याने त्याच्या वेदना काय असतात, हे मी समजू शकते. अशा लोकांना आधाराची गरज असते, असे सांगताना ...
.png)
दीपिकाने केलाय मानसिक आजाराचा सामना
मानसिक आजारांबाबत जनजागृती करण्यासाठीच्या देशव्यापी अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या अभिनयानाच्या उद्घाटनाला दीपिकाने हजेरी लावली. यावेळी बोलताना दीपिका भावूक झालेली दिसली. आज सर्वत्र प्रचंड स्पर्धा वाढलीय. जणू स्पर्धा हेच आपले जीवन झाले आहे. माणसांमधील संवेदनशीलता, करूणा हरवत चाललीयं. यातच अनेकांना मानसिक आजारांनी ग्रासले आहे. मानसिक आजार समाजातून नष्ट व्हायला हवेत, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र दुर्दैवाने याकडे कुणाचेही फारसे लक्ष नाही.
मी स्वत: डिप्रेशनमधून गेलेयं. त्या काळात मी भोगलेले दु:ख, वेदना मला शब्दांत सांगता येणार नाही. मी यातून बाहेर पडले. कारण माझ्या आईने मला मोलाची साथ दिली. तिच्या प्रेमामुळे मी या आजारातून कायमचे बाहेर पडले. ती नसती तर? ही कल्पनाही मला करवत नाही, असे दीपिका यावेळी म्हणाली. हे सांगताना तिला अश्रू अनावर झालेत. मी या आजाराचा सामना केलायं. त्यामुळेच मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांची मानसिक अवस्था मी समजू शकते,असेही दीपिका यावेळी म्हणाली.
दीपिकाचा आगामी हॉलिवूडपट ‘ट्रीपल एक्स : द रिर्टन आॅफ झेंडर केज’ हा लवकरच प्रदर्शित होणार असून ती यात विन डिजेलच्या अपोझिट पहायला मिळणार आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित करीत असलेल्या ‘पद्मावती’ या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत असून यात रणवीर सिंह व शाहीद कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.