‘द ममी’ साठी दीपिकाने दिले आॅडिशन ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2016 11:28 IST2016-05-05T05:58:09+5:302016-05-05T11:28:09+5:30

आपल्याला तर माहितीच आहे की, दीपिका पदुकोन सध्या हॉलीवूड चित्रपटांमध्ये चांगलीच रमली आहे. सध्या ती ‘ट्रिपल एक्स : द ...

Deepika gave audition for 'The Mummy'? | ‘द ममी’ साठी दीपिकाने दिले आॅडिशन ?

‘द ममी’ साठी दीपिकाने दिले आॅडिशन ?

ल्याला तर माहितीच आहे की, दीपिका पदुकोन सध्या हॉलीवूड चित्रपटांमध्ये चांगलीच रमली आहे. सध्या ती ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. ती कॅनडा येथे काही महिन्यांपासून चित्रपटाची शूटिंग करत आहे.

पण, एवढ्यावरच ती थांबायला तयार नाही. तिला एका खुप चांगल्या चित्रपटाची आॅफर आली आहे. मार्च महिन्यात दीपिका पदुकोन लॉस एंजलिस येथे गेली होती. तिचे टेनिस स्टार नोवाक योकोव्हिच सोबत फोटो आपण पाहिले.

त्याच्यासोबत डिनरचे खरे कारण आता आपल्याला कळते आहे, ते म्हणजे दीपिका टॉम क्रुझ यांच्या ‘द ममी’ चित्रपटासाठी आॅडिशन देण्यासाठी गेली होती. अद्याप कुठलीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दीपिका आणि टीम सध्या या बाबतीतच काही घडामोडींची वाट पाहत आहे.

tom cruise

Web Title: Deepika gave audition for 'The Mummy'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.