सिंगिंग क्षेत्रात सोनाक्षी करणार डेब्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 06:25 IST2016-01-16T01:08:44+5:302016-02-12T06:25:29+5:30
प्रि यंका चोप्रा आणि आलिया भट्ट नंतर सोनाक्षी सिन्हाही आता गायनाच्या क्षेत्रात डेब्यू करणार आहे. 'आज मूड इश्कहोलिक है' ...

सिंगिंग क्षेत्रात सोनाक्षी करणार डेब्यू
प रि यंका चोप्रा आणि आलिया भट्ट नंतर सोनाक्षी सिन्हाही आता गायनाच्या क्षेत्रात डेब्यू करणार आहे. 'आज मूड इश्कहोलिक है' या गाण्याच्या माध्यमातून ती सिंगींग क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. हे एक सिंगल व्हिडिओ गाणे असून ज्याला टी-सीरीजने प्रोड्यूस केले आहे. याविषयी बोलताना सोनाक्षी म्हणाली,' मी हे गाणे रिलीज केव्हा होते याची उत्सुकतेने वाट पाहतेय. हा माझा सिंगल डेब्यू आहे. हे माझ्यासाठी मनातील स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. हे खुपच शानदार गाणे आहे. जेवढी मजा मला या गाण्यासाठी काम करताना आली तेवढीच हे गाणे ऐकताना चाहत्यांना येईल असे वाटते. हे गाणे गोव्यातील एका शानदार बीचवर चित्रीत करण्यात आले आहे. हे गाणे 'डान्स इंडिया डान्स' फेम सलमान युसूफ खानने कोरिओग्राफ केले आहे. ती गोव्यात पार्टनरसोबत गाणे एन्जॉय करताना दिसेल. गाण्याचा टीजर रिलीज करण्यात आला असून पूर्ण गाणे २३ डिसेंबर रोजी ऐकायला मिळेल.