राखी सावंतच्या आईचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 21:43 IST2023-01-28T21:40:05+5:302023-01-28T21:43:43+5:30
गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या आईच्या आजारामुळे देखील चर्चेत आली होती.

राखी सावंतच्या आईचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध मॉडेल राखी सावंतच्या आईचे निधन झाले आहे. मुंबईतील रुग्णालयात आज रात्री ८.३२ वाजता जया भेडा यांनी अखेरचा श्वास घेतला. राखी सावंत सध्या आपल्याखाजगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत असते. बोल्ड, बिनधास्त आणि आपल्या हटके स्टाईलमुळे तिची बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या आईच्या आजारामुळे देखील चर्चेत आली होती. या महिन्याच्या सुरुवातीला राखीने आईला ब्रेन ट्यूमर झाल्याचे सांगितले होते.
मुंबईतील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जया सावंत यांना दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून जया यांच्यावर येथेच उपचार सुरू होते. दरम्यान, राखी आईसाठी रात्रंदिवस प्रार्थना करत होती. त्यातूनच ती प्रार्थनेसाठी एका NGO मध्येही पोहोचली होती, जिथे तिने मुलांना आईसाठी प्रार्थना करायला सांगितले होते. मात्र, राखीच्या आईंचे आज निधन झाले. त्यामुळे, राखीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, राखीने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये, राखी या एनजीओमधल्या मुलांना चिप्स, कुरकुरे आणि लेसचे पॅकेट देताना दिसली. त्यानंतर राखी तिथल्या मुलांना बोलते की माझ्या आईसाठी प्रार्थना करा. मग राखी त्या मुलांसोबत मिळून केक कापते. दरम्यान, तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. याशिवाय राखीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत राखीच्या हातात 500 रुपयांच्या नोटेचं एक बंडल असल्याचे दिसत आहे. त्यानंतर राखी हे पैसे एनजीओमध्ये असलेल्या मुलांना वाटते.