विद्युत जामवालच्या ‘कमांडो २’ प्रदर्शनाची तारीख बदलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 14:21 IST2016-12-04T18:57:26+5:302016-12-08T14:21:16+5:30
दिग्दर्शक देवेन भोजानी यांच्या आगामी ‘कमांडो २’ या चित्रपटात अभिनेता विद्युत जामवाल काळ्या धनाचा पाठलाग करताना दिसणार आहे. पंतप्रधान ...

विद्युत जामवालच्या ‘कमांडो २’ प्रदर्शनाची तारीख बदलली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी ५०० व १००० रुपयांचे चलन (नोटा) तत्काळ बंद करीत असल्याचे सांगितले. याच पार्श्वभूमीवर निर्माता विपुल शहा व दिग्दर्शक देवेन भोजानी यांच्या ‘कमांडो २’ या चित्रपटात एक राजकारणी काळ्या पैशांवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर पावले उचलित असल्याचे दाखविण्यात आले आहे असे निर्माता विपुल शहा यांनी सांगितले होते. याला दिग्दर्शक देवेश भोजानी यांनी देखील दुजोरा दिला होता.
‘कमांडो २’ च्या प्रदर्शनाची तारीख बदलविण्याची माहिती देताना विपुल शहा म्हणाले, आधी आमचा चित्रपट ६ जानेवारीला प्रदर्शित होणार होता, मात्र याच दरम्यान आणखी काही चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यात विन डिझेलच्या ट्रिपल एक्सचा देखील समावेश आहे. आम्ही दुसरा आठवडा मोकळा असावा अशी तारीख पाहत आहोत. जानेवारीच्या दुसºया आठवड्यात बिग बजेट चित्रपट असल्याने आम्ही ‘कमांडो २’चे प्रदर्शन ३ मार्च ला करण्याचे ठरविले आहे. या चित्रपटात काळ्या पैशाविरुद्ध लढा देणारा नायक तुम्हाला पहायला मिळेल अशी पुश्ती त्यांनी जोडली.
देशात नोटबंदी झाल्याने त्याचा परिणाम आपल्या चित्रपटावर होऊ शकतो असे वाटत असल्याने अनेक चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. नोटबंदीचा सर्वाधिक परिणाम असताना विपुल शहा यांचा फोर्स २ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता मात्र त्याला प्रेक्षकांचा अत्यल्प प्रतिसाद लाभला होता.