बॉलिवूडसाठी धोक्याची घंटा! चित्रपटगृहांत जाणा-या प्रेक्षकांची संख्या घटली!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2017 12:55 IST2017-03-22T07:25:11+5:302017-03-22T12:55:11+5:30

दिवसागणिक बॉलिवूडचा पसारा वाढतो आहे. रोज नव-नवे चित्रपट येत आहेत. नव-नवे चेहरे बॉलिवूडमध्ये आपले भाग्य आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत. ...

Dangers for Bollywood! The number of viewers in the theater went down !! | बॉलिवूडसाठी धोक्याची घंटा! चित्रपटगृहांत जाणा-या प्रेक्षकांची संख्या घटली!!

बॉलिवूडसाठी धोक्याची घंटा! चित्रपटगृहांत जाणा-या प्रेक्षकांची संख्या घटली!!

वसागणिक बॉलिवूडचा पसारा वाढतो आहे. रोज नव-नवे चित्रपट येत आहेत. नव-नवे चेहरे बॉलिवूडमध्ये आपले भाग्य आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक शुक्रवारी कमीत कमी चार ते पाच तरी चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यातील काही चित्रपट पहिल्याच दिवशी आपटत आहेत तर काही १०० कोटींच्या क्लबमध्येदेखील दाखल होत आहे. गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांनी 100 कोटी किंवा त्याहून अधिकचा गल्ला जमवणे हे काही कठीण राहिलेले नाही. केवळ 100च कोटी नव्हे तर अनेक चित्रपट 300 कोटीहूनही अधिक कमाई करत आहेत. आमिर खानच्या दंगल आणि सलमान खानच्या सुल्तान या चित्रपटांनी तर कमाईचे सगळे रेकॉर्ड तोडत ३०० कोटी रूपयांहून अधिक गल्ला जमवला आहे. हे आकडे पाहाता अनेक लोक चित्रपटगृहात जाऊनच चित्रपट पाहात असणार असेच तुम्हाला वाटले असेल. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. गेल्या वर्षभरता चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत घट झाली आहे. 

आॅरमॅक्स मीडियाने केलेल्या सर्वेक्षणातून ही गोष्ट समोर आली आहे. त्यांनी त्याचा अहवालदेखील सादर केला आहे. त्यांनी अहवालात सादर केलेल्या आकडेवारीवर नजर टाकली तर आपल्या हे लगेचच लक्षात येते. चित्रपटगृहात दिवसेंदिवस प्रेक्षक येण्याचे प्रमाण कमी होत आहे. यावर प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांनी काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत म्हटले होते. भारतीय सिनेमासाठी ही गोष्ट धोकादायक असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांनी म्हटले होते की, मल्टीप्लेक्समुळे तिकिटांच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे खूपच कमी लोक तिकिटांवर पैसे खर्च करत आहेत. अनेकांना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहाण्याची इच्छा असली तरी ही गोष्ट त्यांच्या खिशांना परवडणारी नाहीये. तसेच अनेक तरुण चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहाण्यापेक्षा सोशल मीडियावर वेळ घालवणे आणि युट्युबला कार्यक्रम पाहाणे पसंत करतात. त्यामुळे या तरुणांना चित्रपट चित्रपटगृहात पाहाण्याची सवय लावणे गरजेचे आहे.  आॅरमॅक्स मीडियाने यंदाचा बॉलिवूड आॅडियन्स रिपोर्ट सादर केला आहे. त्यासाठी त्यांनी नियमित चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येचा अभ्यास केला आहे. या अभ्यासावरून गेल्या वर्षभरात प्रेक्षकांच्या संख्येत ११ टक्क्यांची घट झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. २०१५ मध्ये चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहाणाऱ्यांची संख्या ३.६६ कोटी इतकी होती. पण २०१६ मध्ये ही संख्या ३.२७ कोटींवर आली आहे. तसेच गेल्या वर्षभरात महिलांच्या तुलनेत पुरूष प्रेक्षकांची पावले चित्रपटगृहांकडे अधिक वळली आहेत. २०१५ च्या पहिल्या वीकेंडची आकडेवारी बघता, पुरुष प्रेक्षकवर्गांची संख्या ६५ टक्के होती. २०१६ मध्ये ही संख्या ६७ टक्क्यांवर गेली आहे.

चित्रपट चित्रपटगृहातच जाऊन पाहाण्याचा अनुभव हा खूपच वेगळा असतो. पण तरीही चित्रपट आॅनलाइन लीक होत असल्याने काहीवेळा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या दिवशीच ते अनेकांच्या मोबाइलमध्ये आलेले असतात. त्यामुळे पैसे खर्च करून चित्रपटगृहात जाण्याची अनेकांची इच्छा होत नाही आणि याचा फटका चित्रपटांच्या व्यवसायाला बसतो.   

गेल्या वर्षांत हे  तीन चित्रपट महिला प्रेक्षकवर्गांमुळे तरले



‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’,‘नीरजा’ आणि ‘पिंक’  या चित्रपटांचे बॉक्स आॅफिसवरचे भविष्य खऱ्या अर्थांनी महिलांनी ठरवले असे या अहवालातून समोर आले आहे. या तिन्ही चित्रपटांना पुरुषांपेक्षा महिला प्रेक्षकवर्ग अधिक लाभला.

गेल्या वर्षी या अभिनेत्रींना मिळाली प्रेक्षकांची पसंती



या वषार्तील गेल्या महिनाभराचा आढावा घेतलास काही अभिनेत्रींनी प्रेक्षकांच्या पसंती यादीत पहिल्या दहांमध्ये स्थान मिळवले आहे. आॅरमॅक्स मीडियाच्या सर्वेक्षणानुसार, या यादीत दीपिका पादुकोण पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर कॅटरिना कैफ, तिसऱ्या क्रमांकावर आलिया भट्ट, तर चौथ्या क्रमांकावर प्रियांका चोप्रा आहे. त्या पाठोपाठ ऐश्वर्या राय, करिना कपूर, श्रद्धा कपूर, माधुरी दीक्षित, अनुष्का शर्मा आणि काजोल यांचा क्रमांक आहे.

Web Title: Dangers for Bollywood! The number of viewers in the theater went down !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.