युरोपच्या रस्त्यावर फातिमा सना शेख व सान्या मल्होत्राचा तुफान डान्स! पाहा, व्हिडिओ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 20:40 IST2018-08-30T20:37:58+5:302018-08-30T20:40:41+5:30

 फातिमा व सान्याचा हा तुफान व्हिडिओ आत्तापर्यंत २ लाखांवर लोकांनी पाहिला आहे.

'Dangal' Girls Fatima Sana Shaikh And Sanya Malhotra Dance On The Streets Of Europe | युरोपच्या रस्त्यावर फातिमा सना शेख व सान्या मल्होत्राचा तुफान डान्स! पाहा, व्हिडिओ!!

युरोपच्या रस्त्यावर फातिमा सना शेख व सान्या मल्होत्राचा तुफान डान्स! पाहा, व्हिडिओ!!

आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटात फोगट बहिणींची भूमिका साकारून नावारूपास आलेल्या फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा या दोघी बॉलिवूट नट्या सध्या युरोपच्या टूरवर आहेत. युरोपच्या रस्त्यांवरचा फातिमा व सनाचा एक व्हिडिओ सध्या वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत फातिमा-सना तुफान डान्स करताना दिसताहेत. फातिमाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. ‘युरोमध्ये बिनधास्त धम्माल सुरू आहे, विश्वास बसत नाही,’ असे तिने या व्हिडिओला कॅप्शन देताना लिहिलेय. युरोप टूरचे काही फोटोही तिने शेअर केले आहेत. ‘तू अगदी खरे बोललीस सान्या, ब्रेक घेणे कुणी आपल्याकडून शिकावे,’ असे तिने लिहिलेय. फातिमा व सान्याचा हा तुफान व्हिडिओ आत्तापर्यंत २ लाखांवर लोकांनी पाहिला आहे.


‘दंगल’मध्ये सान्या व फातिमाने फोगट बहिणींची भूमिका साकारली होती. पण बहिणींची भूमिका साकारता साकारता दोघीही इतक्या चांगल्या मैत्रिणी झाल्यात की, ‘दंगल’नंतरही त्यांच्या मैत्रीत खंड पडला नाही. हा व्हिडिओ त्याचा पुरावा म्हणायला हवा.
सध्या सान्या ‘पटाखा’ या विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटात बिझी आहे. यानंतर ‘फोटोग्राफर’ आणि ‘बधाई हो’ या दोन चित्रपटांत ती दिसणार आहे. फातिमाचे म्हणाल तर ती आमिर खानसोबतच ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये व्यस्त आहे.

 

Web Title: 'Dangal' Girls Fatima Sana Shaikh And Sanya Malhotra Dance On The Streets Of Europe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.