नागपुरात अवतरली ‘डान्सिंग कार’...घडली "पिके"ची पुनरावृत्ती !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2016 15:15 IST2016-08-14T09:42:04+5:302016-08-14T15:15:15+5:30
रस्त्याच्या बाजूला उभी असलेली कार हलत असल्याने पेट्रोलिंग करणाºया एका पोलिसाला भर दुपारी एका निवांत ठिकाणी संशयास्पद 'डान्सिग कार' ...
.jpg)
नागपुरात अवतरली ‘डान्सिंग कार’...घडली "पिके"ची पुनरावृत्ती !
मेडिकलच्या शविच्छेदन गृहासमोर काचबंद एक कार हालत असल्याची पेट्रेलिंगवर असलेल्या पोलिसांना दिसली. त्यांनी दार उघडून बघितले असता त्यांना नको ते दृश्य समोर दिसले. एक अर्ध नग्नावस्थेतील युवती आणि वकील अश्लील चाळे करत होते. पोलिसांना पाहताच त्याच अवस्थेत तरुणीने कारमधून पळ काढला. त्यामुळे तर संबंधित पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाली.
पोलिसांना वकिलाला ताब्यात घ्यायचे की, पळून गेलेल्या अर्धनग्नअवस्थेतील युवतीला शोधायचे हा प्रश्न पडला. पोलिसांनी मोठा ताफा बोलवला. मेडिकलचा संपूर्ण परिसरत पिंजून काढल्यानंतर लपून बसलेली तरुणी त्यांना दिसली. मग कारमध्ये राहिलेले तिचे कपडे दिले.