दबंग सलमान खानने टॅक्स भरण्यातही दिली हृतिक रोशन, अक्षय कुमारला धोबीपछाड; जाणून घ्या किती भरला टॅक्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 22:12 IST2017-03-21T16:42:46+5:302017-03-21T22:12:46+5:30

सलमान खान बॉलिवूडचा असा किंग आहे, ज्याला आजही इंडस्ट्रीमध्ये हुकमी एक्का म्हणून ओळखले जाते. सलमानचा कुठलाही चित्रपट असो तो ...

Dabangg: Hrithik Roshan, Akshay Kumar, Dhobi Pachad, also paid tribute to Salman Khan; Learn How Filled Taxes! | दबंग सलमान खानने टॅक्स भरण्यातही दिली हृतिक रोशन, अक्षय कुमारला धोबीपछाड; जाणून घ्या किती भरला टॅक्स!

दबंग सलमान खानने टॅक्स भरण्यातही दिली हृतिक रोशन, अक्षय कुमारला धोबीपछाड; जाणून घ्या किती भरला टॅक्स!

मान खान बॉलिवूडचा असा किंग आहे, ज्याला आजही इंडस्ट्रीमध्ये हुकमी एक्का म्हणून ओळखले जाते. सलमानचा कुठलाही चित्रपट असो तो बॉक्स आॅफिसवर धूम उडवून देतो, शिवाय कमाईचे अनेक रेकॉर्डही ब्रेक करतो. त्यामुळेच सर्वाधिक यशस्वी अभिनेता म्हणून त्याच्याकडे बघितले जाते. परंतु सलमानच्या नावावर केवळ कमाईचेच नव्हे तर टॅक्स भरण्याचाही रेकॉर्ड आहे. अक्षय कुमार, हृतिक रोशन यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांना टॅक्स भरण्यात मागे टाकत त्याने याबाबतचे रेकॉर्ड स्वत:च्या नावावर नोंदविले आहे.



सलमानने २०१६-१७ या आर्थिक वर्षात हे रेकॉर्ड स्वत:च्या नावावर नोंदविले आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार सलमान खानने यावर्षी ४४ कोटी रुपये अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरला आहे. हा टॅक्स भरताना त्याने अक्षय कुमार, हृतिक रोशन यांच्यासह शाहरूख खान, ऐश्वर्या राय- बच्चन आणि अमिताभ बच्चन या दिग्गजांना धोबीपछाड दिली आहे. कारण आतापर्यंत हा रेकॉर्ड त्यांच्याच नावावर असायचा. याचवर्षी नव्हे तर गेल्यावर्षीही सलमानने तब्बल ३२ कोटी रुपये एवढा टॅक्स भरला होता. 



अक्षय कुमारविषयी बोलायचे झाल्यास गेल्यावर्षी त्याचे बॅक टू बॅक तीन चित्रपट सुपरहिट ठरले होते. या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली होती. मात्र अशातही अक्षयने यावर्षी २९ कोटी रुपये एवढा अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरला आहे. तो या यादीत दुसºया स्थानावर राहिला आहे. तर हृतिक रोशनने २५.५ कोटी रुपयांचा टॅक्स भरून तिसरे स्थान मिळवले आहे. 



मात्र या यादीत सर्वाधिक धक्कादायक एंट्री राहिली ती कॉमेडियन कपिल शर्माची. गेल्या काही दिवसांपासून सहअभिनेता सुनील ग्रोव्हर याच्याशी केलेल्या मारपीटमुळे चर्चेत आलेल्या कपिलने यावर्षी तब्बल २३ कोटी रुपये एवढा टॅक्स भरला आहे. गेल्यावर्षी त्याने केवळ ७ कोटी रुपये टॅक्स भरला होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत कपिलच्या कमाईत २०६ टक्क्यांची ग्रोथ बघावयास मिळाली. कपिलप्रमाणेच रणबीर कपूर याने १६ कोटी रुपयांचा टॅक्स भरला आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे आमिर खान या यादीत खूपच खालच्या स्थानावर आहे. त्याने केवळ १४ कोटी रुपयांचा टॅक्स भरला आहे. त्याने भरलेली ही रक्कम बरेचसे प्रश्न निर्माण करणारे आहेत. कारण त्याच्या प्रॉपर्टीमध्ये तब्बल १४० कोटी रुपयांची भर पडली आहे. 



अभिनेत्रींविषयी बोलायचे झाल्यास दीपिका पादुकोण या लिस्टमध्ये आघाडीवर आहे. तिने यावर्षी १० कोटी रुपयांचा अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरला आहे. दुसºया स्थानावर आलिया भट्ट असून, तिने ४.३ कोटी रुपयांचा टॅक्स भरला आहे. आलियानंतर करिना कपूर खान हिचा क्रमांक लागत असून, तिने ३.९ कोटी रुपयांचा टॅक्स भरला आहे. 

Web Title: Dabangg: Hrithik Roshan, Akshay Kumar, Dhobi Pachad, also paid tribute to Salman Khan; Learn How Filled Taxes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.