रूपेरी पडद्यावरचे क्रिकेटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 03:17 IST2016-03-16T10:17:37+5:302016-03-16T03:17:37+5:30

रूपेरी पडद्यावरचे क्रिकेटर बॉलिवूड आणि क्रिकेटचे नाते खूप जूने आणि सखोल आहे. जे काळाबरोबर अजून जास्त घट्ट होत चालले ...

Cricketer on the silver screen | रूपेरी पडद्यावरचे क्रिकेटर

रूपेरी पडद्यावरचे क्रिकेटर

पेरी पडद्यावरचे क्रिकेटर
बॉलिवूड आणि क्रिकेटचे नाते खूप जूने आणि सखोल आहे. जे काळाबरोबर अजून जास्त घट्ट होत चालले आहे. कधी क्रिकेटर फिल्मी पडद्यावर दिसतात, तर कधी चित्रपट स्टार्स पडद्यावर क्रिकेटरच्या रोलमध्ये दिसतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलावंत आहेत ज्यांनी आपल्या अप्रतिम अभिनयाने क्रिकेटरची भूमिका फारच सुंदर साकारली आहे.  

या कलाकारांमध्ये आमिर खानचे नाव सर्वप्रथम लक्षात येते, ज्याने ‘लगान’ मध्ये भुवन बनून क्रिकेट खेळले आणि  इंग्रजांना हरवून लगान माफ करून घेतला. लगानच्या आधी आमिरने देव आनंदच्या ‘अव्वल नंबर’ या चित्रपटात क्रिकेटरचा रोल केला होता. हा चित्रपट त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या चित्रपटांमधील होता. यात आमिर खान नायक आणि व्हिलेनच्या रोलमध्ये आदित्य पांचोली होता. तो देखील क्रिकेटरच होता. पण, हा सिनेमा बॉक्स आॅफिसवर फ्लॉप ठरला.

कुमार गौरवनेही ‘आॅल राउंडर’ नावाच्या चित्रपटात क्रिकेटरचा रोल केला होता. पूनम ढिल्लो या चित्रपटात नायिका होती. मात्र बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट क्लीन बोल्ड झाला. दुसºया ज्या कलाकारांनी पडद्यावर क्रिकेटरचा रोल निभविला, त्यात श्रेयस तळपदे आहे, ज्याने नागेश कुन्नरूच्या  ‘इकबाल’चित्रपटात एका कर्णबधीर तरुणाची भूमिका केली होती. जो भारतीय क्रिकेट टीम मध्ये जलद गोलंदाज बनण्याचे स्वप्न पाहतो. याच प्रकारे ‘पटियाला हाउस’ चित्रपटात अक्षय कुमारदेखील जलद गोलंदाजचा रोल करतो. मात्र ही गोलंदाजी भारतासाठी नव्हे तर, ब्रिटिश टीमसाठी असते. हरमन बावेजाने ‘विक्ट्री’ चित्रपटात क्रिकेट स्टारचा रोल केला होता, तर ‘हैट ट्रिक’मध्ये कुणाल कपूर क्रिकेटर बनला होता. या यादीत रानी मुखर्जीचेही नाव आहे. जिने शाहिद कपूरसोबत ‘दिल बोले हडप्पा’ मध्ये महिला क्रिकेटरचा रोल केला होता. आगामी काळातील अजहर आणि धोनी वर आधारित चित्रपट प्रदर्शित होत आहेत. अजहर मध्ये इमरान हाश्मी आणि धोनीच्या चित्रपटात सुशांत राजपूत मुख्य भूमिका करीत आहेत. 

Web Title: Cricketer on the silver screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.