जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 11:08 IST2025-08-10T11:05:55+5:302025-08-10T11:08:40+5:30

भारताचा स्टार क्रिकेटर मोहम्मद सिराजनेही रक्षाबंधनचा सण साजरा केला. याचे फोटो समोर आले आहेत. 

cricketer mohammed siraj and asha bhosale granddaughter zanai celebrate rakshabandhan shared photo | जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर

जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर

देशात शनिवारी(८ ऑगस्ट) रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सेलिब्रिटींनीही आपल्या भावा-बहिणींसोबत रक्षाबंधन साजरं करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. अनेकांनी त्यांच्या रक्षाबंधन सेलिब्रेशनचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले. भारताचा स्टार क्रिकेटर मोहम्मद सिराजनेही रक्षाबंधनचा सण साजरा केला. याचे फोटो समोर आले आहेत. 

मोहम्मद सिराज  गेल्या काही दिवसांपासून त्याच्या मैदानातील खेळीबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. मोहम्मदचं नाव आशा भोसलेंची नात जनाईसोबत जोडलं गेलं होतं. त्यानंतर जनाईने त्यांच्या भाऊ-बहिणीचं नातं असल्याचं स्पष्ट केलं होतं. आता पहिल्यांदाच मोहम्मद आणि जनाईने रक्षाबंधन साजरी केली आहे. जनाईने मोहम्मद सिराजला राखी बांधत लाडक्या भावासोबत रक्षाबंधन सण साजरा केला. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मोहम्मद सिराज आणि जनाईने रक्षाबंधन साजरा केल्यामुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. 


दरम्यान, मोहम्मद सिराजने भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात गोलंदाजीची जादू दाखवली. अत्यंत हुशारीने इंग्लंडच्या फलंदाजांना चीत करत त्याने भारताला विजय मिळवून दिला. त्याच्या उत्तम खेळीने सिराजचं सर्वत्र कौतुक झालं होतं. तेव्हादेखील जनाईने सिराजसाठी पोस्ट टाकून त्याचं कौतुक केलं होतं. 

Web Title: cricketer mohammed siraj and asha bhosale granddaughter zanai celebrate rakshabandhan shared photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.