क्रितीचा नेत्रदानाचा संकल्प!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2016 19:48 IST2016-08-14T14:18:24+5:302016-08-14T19:48:24+5:30
दोन वर्षांपूर्वी ‘हिरोपंती’या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पर्दापण करणारी अभिनेत्री क्रिती सॅनन हिने नेत्रदानाचा संकल्प सोडला आहे. हे सुंदर जग पाहणे ...
.jpg)
क्रितीचा नेत्रदानाचा संकल्प!!
द न वर्षांपूर्वी ‘हिरोपंती’या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पर्दापण करणारी अभिनेत्री क्रिती सॅनन हिने नेत्रदानाचा संकल्प सोडला आहे. हे सुंदर जग पाहणे कुठल्याही वरदानापेक्षा कमी नाही. त्याचमुळे मी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला आहे. एखादा दृष्टिहिन माझ्या डोळ्यांनी हे सुंदर जग पाहू शकेल, यापेक्षा दुसरा कुठलाही मोठा आनंद असू शकत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून नेत्रदान करण्याचे माझ्या मनात होते. माझ्या मते अधिकाधिक लोकांनी नेत्रदानाचा संकल्प करायला हवा, असे क्रिती यावेळी म्हणाली. क्रिती, तुझे विचार निश्चितपणे अनेकांसाठी प्रेरणादायी आहेत. यासाठी तुझे अभिनंदन करायलाच हवे!