अमिताभ बच्चन आले लोकांच्या मदतीसाठी धावून, तब्बल इतक्या लोकांना देणार महिन्याभराचे धान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 04:25 PM2020-04-06T16:25:00+5:302020-04-06T16:25:02+5:30

अभिनेते अमिताभ बच्चन अनेकांच्या मदतीला धावून आले आहेत.

Coronavirus update: Amitabh Bachchan to lend support to feed 1 lakh labourers PSC | अमिताभ बच्चन आले लोकांच्या मदतीसाठी धावून, तब्बल इतक्या लोकांना देणार महिन्याभराचे धान्य

अमिताभ बच्चन आले लोकांच्या मदतीसाठी धावून, तब्बल इतक्या लोकांना देणार महिन्याभराचे धान्य

googlenewsNext
ठळक मुद्देअमिताभ बच्चन आता फिल्म फेडरेशनमधील सगळ्यात महत्त्वाची फेडरेशन मानल्या जाणाऱ्या ऑल इंडिया फिल्म एम्प्लॉइज कॉन्फेडरेशनच्या एक लाख सदस्यांना एक महिन्याचे धान्य मोफत देणार आहेत.

कोरोना व्हायरसचा भारतात फैलाव झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. या दरम्यान सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनही थांबवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर भारतातील अनेक राज्यात मॉल्स, थिएटर बंद करण्यात आले आहेत. चित्रीकरण बंद झाले असल्याने इंडस्ट्रीतील ज्युनिअर आर्टिस्टवर उपासमारीची वेळ आली आहे. स्पॉटबॉय, मेकअप आर्टिस्ट, लाईटमॅन, प्रोडक्शनशी संबंधित लोकांची सध्या अतिशय भयानक स्थिती आहे. त्यांच्या घरात अन्न शिजवायला देखील नसल्याने त्यांना मदत करण्यासाठी विविध संस्था पुढे आल्या आहेत. आता अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या लोकांसाठी एक मोठे काम केले आहे.

अमिताभ बच्चन आता फिल्म फेडरेशनमधील सगळ्यात महत्त्वाची फेडरेशन मानल्या जाणाऱ्या ऑल इंडिया फिल्म एम्प्लॉइज कॉन्फेडरेशनच्या एक लाख सदस्यांना एक महिन्याचे धान्य मोफत देणार आहेत. ही माहिती ऑल इंडिया फिल्म एम्प्लॉइज कॉन्फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक दुबे यांनी नुकतीच दिली आहे. त्यांनी या मौल्यवान कामासाठी अमिताभ यांचे आभार मानले आहेत. 

कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून या साथीला महारोगराई घोषित करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. आगामी दिवस आणि आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जगभरात अनेक ठिकाणी लोकांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे.  

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी मदत करण्यासाठी पुढे आले असून वरुण धवन, भुषण कुमार, राजकुमार राव, कपिल शर्मा, वरुण धवन, शिल्पा शेट्टी यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीत काही लाखांची मदत केली आहे. अभिनेता अक्षय कुमारने तर 25 कोटींची मदत केली असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

Web Title: Coronavirus update: Amitabh Bachchan to lend support to feed 1 lakh labourers PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.