मी इतक्या दिवस शांत राहिले कारण...! ‘कोरोना’ मुक्त कनिका कपूरने सोडले मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 05:22 PM2020-04-27T17:22:35+5:302020-04-27T17:23:18+5:30

कनिका लिहिते...

coronavirus singer kanika kapoor breaks silence on instagram post-ram | मी इतक्या दिवस शांत राहिले कारण...! ‘कोरोना’ मुक्त कनिका कपूरने सोडले मौन

मी इतक्या दिवस शांत राहिले कारण...! ‘कोरोना’ मुक्त कनिका कपूरने सोडले मौन

googlenewsNext
ठळक मुद्देएखाद्या व्यक्तीवर टीका केल्याने सत्य बदलत नाही, हे मला यातून सांगायचे आहे...

बेबी डॉल, चिटियां कलाईया सारखी सुपरहिट गाणी देणारी गायिका कनिका कपूर हिची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. बॉलिवूड सेलिब्रेटींमध्ये अधिकृतरित्या कोरोना पॉझिटीव्ह असलेली कनिका कपूर ही पहिलीच सेलिब्रेटी होती. त्यामुळे  कनिका कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर ती हेडलाईन झाली होती.  लंडनवरुन भारतात परतल्यावर कनिकाने एक हायप्रोफाइल पार्टी अटेंड केली होती. ज्यात राजकीय वतुर्ळातील अनेक नेते आणि जज यांच्यासह जवळपास 300 लोक सामील झाले होते. साहजिकच कनिका कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळल्यानंतर सगळ्यांचे धाबे दणाणले होते. कनिकाने ती पॉझिटीव्ह असल्याची माहिती लपवून अनेकांचा जीव धोक्यात टाकल्याचा आरोपही झाला होता. या पार्श्वभूमीवर तिच्याविरोधात तीन गुन्हेही दाखल करण्यात आले होते. आत्तापर्यंत कनिका या सगळ्यावर काहीही बोलली नव्हती. पण महिनाभरानंतर आता तिने मौन सोडले आहे. होय, इन्स्टावर एक भलीमोठी पोस्ट लिहून तिने आपली बाजू मांडली आहे.

 

कनिका लिहिते,
माझ्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या, पसरवल्या गेल्यात, मला ठाऊक आहे. मी याऊपरही शांत राहिल्यामुळे काहींनी त्यात तेल ओतण्याचेही काम केले. पण मी चुकले म्हणून शांत नव्हते तर लोकांचा गैरसमज झालाय, हे चांगले माहित असल्यामुळे मी शांत राहणे पसंत केले होते.  योग्य वेळी सत्य बाहेर येण्याची मी वाट पाहत होते.  मी सध्या आईवडिलांसोबत लखनौ इथल्या घरी आहे.

युके असो, मुंबई असो किंवा मग लखनौ असतो, माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीता रिपोर्ट कोविड 19 निगेटीव्ह आला आहे, हे मला मुद्दामून सांगावेसे वाटते. मी 10 मार्च रोजी युकेहून मुंबईला आले आणि विमानतळावर माझी रितसर तपासणी झाली. त्यादिवशी मला क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार असे काहीही  सांगण्यात आले नव्हते. मला कसलीच लक्षणे जाणवली नव्हती म्हणून मी स्वत:ला क्वारंटाइन केले नव्हते.

माझ्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मी 11 मार्च रोजी लखनौला गेले. त्यावेळी देशांतर्गत विमानतळावरही स्क्रीनिंग नव्हती. 14 आणि 15 मार्च रोजी मी मित्रांसोबत लंच व डिनरला गेले होते. मी कोणतीच पार्टी आयोजित केली नव्हती. माझी तब्येतसुद्धा चांगली होती. 17 आणि 18 मार्च रोजी माझ्यात काही लक्षणे दिसू लागली तेव्हा करोनाची चाचणी करण्यात आली. 19 मार्च रोजी चाचणी झाली आणि 20 मार्च रोजी मी करोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. यानंतर  मी रुग्णालयात दाखल झाले. तीन निगेटीव्ह रिपोर्ट्स आल्यानंतर मला डिस्चार्ज देण्यात आला आणि आता 21 दिवस मी घरीच राहणार आहे. माझ्यावर उपचार करणारे डॉक्टर्स व नर्सेसचे मी विशेष आभार मानते. प्रत्येकजण संवेदनशील व प्रामाणिकपणे याकडे पाहिल अशी मी आशा करते. एखाद्या व्यक्तीवर टीका केल्याने सत्य बदलत नाही, हे मला यातून सांगायचे आहे...

Web Title: coronavirus singer kanika kapoor breaks silence on instagram post-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.