CoronaVirus: कोरोनामुळे ही अभिनेत्री अडकली दुबईत, पुढे ढकलले लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 13:17 IST2020-04-16T13:16:16+5:302020-04-16T13:17:09+5:30
गेल्या महिन्याभरापासून ही अभिनेत्री दुबईत अडकली आहे.

CoronaVirus: कोरोनामुळे ही अभिनेत्री अडकली दुबईत, पुढे ढकलले लग्न
सध्या जगभरात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अनेक देश आणि कित्येक राज्य लॉकडाउनमध्ये आहेत. लॉकडाउनमुळे कलियों का चमन या गाण्यातून चर्चेत येणारी बॉलिवूड अभिनेत्री मेघना नायडू गेल्या महिन्याभरापासून दुबईत अडकली आहे. यातच मेघनाला तिचे लग्नही पुढे ढकलावे लागले.
मेघना नायडू कोरोना व्हायरसमुळे अडचणीत आली आहे. लॉकडाऊनमुळे ती दुबईतच अडकली आहे. तिथे तिला एक महिना झाला आहे. या सगळ्यामध्ये तिला आपले लग्नही रद्द करावे लागले आहे. मेघना तिच्याच पतीसोबत दुसरं लग्न करणार होती.
मीडिया रिपोर्टनुसार, मेघना दुबईत अडकली आहे जिथे खूप सक्ती आहे. जिथे भारतात लोक गरजेच्या वस्तूंसाठी घराच्या बाहेर पडत आहेत तिथे त्यांना रेशन दुकानात जाण्यासाठीही लायसन्स लागत आहे.
मेघनाने काही दिवसांपूर्वीच टेनिस प्लेयर लुईस मिगुएल रिससोबत सिक्रेट पद्धतीनं लग्न केलं होतं. लवकरच ती पतीसोबत पुन्हा एकदा व्हाईट वेडिंग करणार होती. परंतु लॉकडाऊनमुळे तिला लग्नाचा प्लॅन रद्द करावा लागला आहे.
मेघनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिनं काही चित्रपटात आणि मालिकेत काम केले आहे. ससुराल सिमर का या मालिकेतही ती दिसली आहे. कलियों का चमन या गाण्यातून ती खूप चर्चेत आली होती.