बी टाऊनच्या ‘या’ अभिनेत्रीने केली देसी गर्ल प्रियांका चोप्राची कॉपी !!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 17:35 IST2020-02-23T17:34:50+5:302020-02-23T17:35:18+5:30
बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीने प्रियांका चोप्राची कॉपी केली आहे.

बी टाऊनच्या ‘या’ अभिनेत्रीने केली देसी गर्ल प्रियांका चोप्राची कॉपी !!
प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी बॉलिवूडचे सेलिब्रिटी काहीही करायला तयार होतात, हे अगदी खरे आहे. मग ते एकमेकांची कॉपी करणं का होईना..पण हे सेलिब्रिटी करतातच. आता हेच बघा ना, भूमी पेडणेकरने म्हणे देसी गर्ल प्रियांका चोप्राच्या ड्रेसची चक्क कॉपी केली. विश्वास बसत नाही, पण होय हे खरे आहे.

जगभरातील फॅशन वर्ल्डमध्ये हॉट अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही चांगलीच चर्चेत असते. नुकतीच ती तिच्या एका सेक्सी ड्रेसिंग फोटोमुळे चर्चेत होती. प्रियांकाच्या या फोटोतुन तिचे क्लीवेज दिसत होते. या फोटोंवरून ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली. आता ही प्रसिद्धी पाहून भूमी पेडणेकरने अशाच प्रकारच्या आऊटफिटमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. आता ती देखील तेवढीच ट्रोल होताना पाहायला मिळतेय. 

भूमीने नुकतीच ‘नेक्स ब्रँड व्हिजन समिट अॅण्ड अवॉर्ड २०२०’ मध्ये ती या हॉट अवतारात रेड कार्पेटवरून एंट्री केली. तिने या ड्रेसिंगसाठी देसी गर्ल प्रियांका चोप्राकडून प्रेरणा घेतली होती. भूमीचा हा गाऊन पीच कलरचा होता पण पॅटर्न पूर्णपणे पीसीच्या ड्रेसप्रमाणेच होता. ती या ड्रेसिंगमध्ये खुपच कॉन्फिडंट वाटत होती.
भूमीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, ती सध्या ‘दुर्गावती’ चित्रपटाचे चित्रीकरणात बिझी आहे. ती अलीकडेच सायकलिंग करत चित्रपटाच्या सेटवर पोहोचल्याचे समजते. भूमीचा बॉलिवूडमधील प्रवास खुपच प्रेरणादायी राहिलेला आहे. तिने वजन कमी करण्यापासून ते आजच्या स्लिम ट्रिम होण्यापर्यंतचा हा प्रवास खुपच कठीण होता.