परिणितीने वजन कमी केले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 10:49 IST2016-01-16T01:14:12+5:302016-02-07T10:49:19+5:30

ती पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये आली तेव्हा सर्वांनी प्रियांका चोप्राची बहीण म्हणूनच तिच्याकडे बघितले. पण ती तिच्या आवडीच्या भूमिका करीत राहिली. ...

Consequently, weight loss! | परिणितीने वजन कमी केले!

परिणितीने वजन कमी केले!

पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये आली तेव्हा सर्वांनी प्रियांका चोप्राची बहीण म्हणूनच तिच्याकडे बघितले. पण ती तिच्या आवडीच्या भूमिका करीत राहिली. तिने कधीच मागे वळून बघितले नाही. ही गोष्ट आहे परिणिती चोप्राची. तिच्याकडे प्रतिभा भरपूर आहे. ती मनमोकळेपणे कोणत्याही विषयावर बोलते. काही विशिष्ट विषयांवर बोलायलासुद्धा तिला कसलाही संकोच वाटत नाही. तेवढाच सहजपणा तिच्या अभिनयातही आहे. नुकतीच ती तिच्या फिटनेसविषयी बोलली. मागील काही काळात तिने बरेच वजन कमी केले. बॉलिवूडमध्ये सडपातळ दिसण्यासाठी अभिनेत्रींवर एकप्रकारचा दबावच असतो. सोनाक्षी सिन्हाला याचा चांगला अनुभव असेल. करिनाने सुद्धा महत्प्रयासाने बरेच वजन कमी केले होते. परिणीतीने सौंदर्यासोबतच सुदृढतेवर भर दिला आहे. व्यायामासह तिने योग्य आहारावरही भर दिला आहे. तिला वजन कमी करायचे होते, पण तिला ते साध्य होत नव्हते. अखेर तिने डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टरांच्या लक्षात आले की तिला अंडी आणि दूध यांची अँलर्जी आहे.
परिणितीला खरंच वजन कमी करण्याची आवश्यकता होती का? ती म्हणाली, अभिनय करण्यासाठी विशिष्ट प्रकारची सुदृढता असणे आवश्यकच आहे. त्यामुळे शरीराला आणि मनाला उत्साह जाणवतो. स्फुर्ती येते. चांगला पोशाख घालावासा वाटतो आणि व्यक्तिमत्वात प्रसन्नता जाणवते. म्हणूनच वजन योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. 

Web Title: Consequently, weight loss!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.