CONGRATS : ऐश्वर्या राय-बच्चनबरोबर ‘या’ दोन अभिनेत्रींना दादासाहेब फाळके पुरस्काराने केले सन्मानित!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2017 12:22 IST2017-04-22T07:44:03+5:302017-04-23T12:22:14+5:30
बॉलिवूडमध्ये आजही ऐश्वर्या राय बच्चन हिचे नाव आघाडींच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. कारण आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने अनेक चित्रपटांमधील भूमिका ...

CONGRATS : ऐश्वर्या राय-बच्चनबरोबर ‘या’ दोन अभिनेत्रींना दादासाहेब फाळके पुरस्काराने केले सन्मानित!!
ब लिवूडमध्ये आजही ऐश्वर्या राय बच्चन हिचे नाव आघाडींच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. कारण आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने अनेक चित्रपटांमधील भूमिका अजरामर केल्या आहेत. याकरिताच तिला दादासाहेब फाळके या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथे झालेल्या एका रंगारंग कार्यक्रमात ऐश्वर्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याव्यतिरिक्त ‘पिंक’ची अभिनेत्री कीर्ती कुल्हारी आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मात्र तुमचा गोंधळ होऊ नये म्हणून आम्ही अगोदरच स्पष्ट करीत आहोत की, हा पुरस्कार भारत सरकारद्वारे दिल्ली येथे आयोजित केला जात असलेला दादासाहेब फाळके पुरस्कार नाही. वास्तविक हा पुरस्कार दादासाहेब फाळके फाउंडेशनच्या वतीने दिला जात असतो. गेल्या तीन वर्षांपासून हा पुरस्कार दिला जात आहे. चित्रपटसृष्टीत योगदान देणाºया कलाकारांचा या पुरस्काराने सन्मान केला जातो.
सोहळ्यात ऐश्वर्या अंजू मोदी आॅउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत होती. अभिषेक बच्चनबरोबर लग्न केल्यानंतर काहीकाळ इंडस्ट्रीपासून दूर असलेल्या ऐश्वर्याने ‘जज्बा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक केले होते. मात्र हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा भावला नव्हता. त्यानंतर तिने ‘सरबजीत’ या बायोपिकमध्ये भूमिका साकारून आपल्यातील परिपक्व अभिनयाची पुन्हा एकदा चुणूक दाखवून दिली. तसेच तिच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटालादेखील प्रेक्षकांनी पसंती दिली. दोन्ही चित्रपटांत ऐश्वर्याच्या भूमिका वेगळ्या धाटणीच्या होत्या. अशातही तिचा अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडला.
![]()
‘सरबजीत’मध्ये ऐश्वर्याने सरबजीतची बहीण दलबीर कौर हिची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठीच तिला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ऐश्वर्या लवकरच पती अभिषेकबरोबर एक चित्रपट करणार असल्याची चर्चा आहे. वृत्तानुसार ऐश्वर्या आणि अभिषेक दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या आगामी ‘गुलाब जामून’ या चित्रपटात काम करण्याची शक्यता आहे. दोघांनाही या चित्रपटाची कथा आवडली असल्याचीही माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर असेही म्हटले जात आहे की, अमिताभ बच्चन यांचीदेखील चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
मात्र अद्यापपर्यंत यास अधिकृतपणे दुजोरा मिळाला नसल्याने प्रेक्षक याबाबतची अधिकृत घोषणा ऐकण्यास उत्सुक आहेत. कदाचित ही घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. असो, दादासाहेब फाळके पुरस्काराविषयी बोलायचे झाल्यास यापूर्वी दिलीपकुमार, आशा भोसले, शाहरूख खान आणि राजकुमार राव यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.