Confirmed ! पुन्हा एकदा कपिल शर्मा घेऊन येतोय ‘द कपिल शर्मा शो’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 06:41 PM2018-08-29T18:41:50+5:302018-08-29T18:42:59+5:30

मागचे अख्खे वर्ष कपिल शर्माची कसोटी पाहणारे ठरले. सहकलाकार सुनील ग्रोव्हरसोबत त्याचे वाजले आणि इथून जणू कपिलचे वाईट दिवस सुरु झालेत.

Confirmed! another season of the kapil sharma show says kapil sharma | Confirmed ! पुन्हा एकदा कपिल शर्मा घेऊन येतोय ‘द कपिल शर्मा शो’!!

Confirmed ! पुन्हा एकदा कपिल शर्मा घेऊन येतोय ‘द कपिल शर्मा शो’!!

googlenewsNext

मागचे अख्खे वर्ष कपिल शर्माची कसोटी पाहणारे ठरले. सहकलाकार सुनील ग्रोव्हरसोबत त्याचे वाजले आणि इथून जणू कपिलचे वाईट दिवस सुरु झालेत. यानंतर कपिलबद्दल चांगल्या बातम्या कमी अन् वाईट बातम्याचं जास्त आल्यात. सुनील ग्रोव्हरसोबत वाद झाल्या झाल्या कपिल मद्याच्या आहारी गेल्याची बातमी आली. मग तो डिप्रेशनमध्ये गेल्याचे कानावर आले. यानंतर कपिलने सेटवर येणेचं बंद केल्याची बातमी आली. पाठोपाठ मीडियाशी त्याने पंगा घेतला. एक्स गर्लफ्रेन्डने त्याच्यावर नाही नाही ते आरोप केलेत. एवढे कमी की काय, वर्षभरात आलेला त्याचा नवा कोरा शो बंद झाला. ‘फिरंगी’ हा चित्रपटही आपटला. यानंतर कपिल अचानक गायब झाला. पण आता कपिल जोरदार पुनरागमनाच्या तयारीत आहे. होय, प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कपिलचा ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा सुरू होणार आहे. होय, सोनी टीव्हीनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. येत्या आॅक्टोबरपर्यंत कपिल त्याच्या शोसह परतणार आहे. याची तयारीही सुरू झाली आहे, असे सोनी टीव्हीच्या सूत्रांनी स्पष्ट केले. निश्चितपणे कपिलच्या चाहत्यांसाठी यापेक्षा आनंदाची बातमी कुठली बरी असू शकते.

 अर्थात यातही एक ट्विस्टही आहेच. ‘द कपिल शर्मा शो’मधून कपिल शर्मा परतणार असला हा शो एका नव्या रूपात आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे, चॅट शो हे स्वरूप कायम ठेवून अन्य काही बदल या शोमध्ये करण्यात येतील. अगदी आगळ्यावेगळ्या रूपात हा शो प्रेक्षकांसमोर येईल.
याचदरम्यान कपिल निर्माता म्हणूनही दिसणार आहे.‘सन आॅफ मनजीत सिंग’ हा पंजाबी चित्रपट कपिल प्रोड्यूस करतोय. आॅक्टोबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Confirmed! another season of the kapil sharma show says kapil sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.