Alia Bhatt pregnancy: महफिल में तेरी...; आलिया भटच्या गुडन्यूजनंतर कंडोम कंपनीची भन्नाट पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 10:15 AM2022-06-28T10:15:28+5:302022-06-28T10:20:18+5:30

Alia Bhatt pregnancy: लग्नानंतर अगदी दोनच महिन्यात आलियाने गुड न्यूज देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आणि मग आलियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. या सगळ्यात एका कंडोम कंपनीने आलिया व रणबीरला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्यात.

Condom brand's cheeky post for Alia Bhatt, Ranbir Kapoor's pregnancy announcement | Alia Bhatt pregnancy: महफिल में तेरी...; आलिया भटच्या गुडन्यूजनंतर कंडोम कंपनीची भन्नाट पोस्ट

Alia Bhatt pregnancy: महफिल में तेरी...; आलिया भटच्या गुडन्यूजनंतर कंडोम कंपनीची भन्नाट पोस्ट

googlenewsNext

Alia Bhatt announced Pregnancy: कपूर कुटुंबात लवकरच नव्या पाहुण्याची एन्ट्री होणार आहे. आलिया भट (Alia Bhatt)आई होणार आहे आणि ही बातमी ऐकून कपूर कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आलिया व रणबीरवर (Ranbir Kapoor) शुभेच्छांचा अक्षरश: पाऊस पडतोय. लग्नानंतर अगदी दोनच महिन्यात आलियाने गुड न्यूज देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आणि मग आलियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. या सगळ्यात एका कंडोम कंपनीने सुद्धा आलिया व रणबीरला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्यात.

 आलियाने इंस्टाग्राम अकाऊंटवरून  आई होत असल्याची बातमी शेअर केली. ‘अवर बेबी... कमिंग सून...,’असं तिने लिहिलं. यानंतर ड्यूरेक्स नावाच्या लोकप्रिय कंडोम कंपनीने एक क्रिएटिव्ह पोस्ट शेअर करत आलिया व रणबीरला शुभेच्छा दिल्या. या कंडोम कंपनीची पोस्ट इतकी व्हायरल झाली की आलियाच्या गुड न्यूजपेक्षा याचीच चर्चा जास्त रंगली.

‘महफिल में तेरी हम तो क्लिअरली नहीं थे...’ अशी पोस्ट शेअर करत ड्यूरेक्स कंपनीने आलिया व रणबीरला शुभेच्छा दिल्यात. रणबीरच्याच एका सुपरहिट गाण्याच्या ओळी बदलून एकदम भन्नाट पद्धतीने या कंडोम कंपनीने नव्याने आई-बाबा होणा-या जोडप्याला आपल्या शुभेच्छा दिल्या आणि मग याचीच चर्चा रंगली. आलिया व रणबीर यांनी गेल्या 14 एप्रिलला लग्न केलं. तेव्हाही ड्यूरेक्स कंपनीने त्यांना अशाच भन्नाट पद्धतीने शुभेव्छा दिल्या होत्या.

‘डिअर रणबीर अ‍ॅप्ड आलिया... महफिल में तेरे हम ना रहें जो... फन तो नहीं है...,’ अशी पोस्ट तेव्हा या कंपनीने शेअर केली होती. ड्यूरेक्स कंपनी आपल्या हटके कन्टेन्ट साठी कायम ओळखली जाते. त्यांच्या पोस्ट कायमच चर्चेचा विषय असतात आणि आता या नव्या पोटावर सुद्धा अगदी भरभरून कमेंट्स येत आहेत.
  

Web Title: Condom brand's cheeky post for Alia Bhatt, Ranbir Kapoor's pregnancy announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.