​ Concept एक ; कथा अनेक ! एकाच पार्श्वभूमीवर येत आहेत अनेक चित्रपट !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 14:16 IST2017-08-02T07:19:15+5:302017-08-02T14:16:12+5:30

सिनेसृष्टीत अनेकदा योगायोग होतात. दोन दिग्दर्शकांनी एकाच विषयावर चित्रपट प्लान करणे किंवा बनवणे, ही बॉलिवूडमध्ये कॉमन गोष्ट आहे. यंदाही ...

Concept One; Many of the stories! Many movies coming on the same background! | ​ Concept एक ; कथा अनेक ! एकाच पार्श्वभूमीवर येत आहेत अनेक चित्रपट !!

​ Concept एक ; कथा अनेक ! एकाच पार्श्वभूमीवर येत आहेत अनेक चित्रपट !!

नेसृष्टीत अनेकदा योगायोग होतात. दोन दिग्दर्शकांनी एकाच विषयावर चित्रपट प्लान करणे किंवा बनवणे, ही बॉलिवूडमध्ये कॉमन गोष्ट आहे. यंदाही असाच एक योगायोग दिसणार आहे. होय, एका कॉमन पार्श्वभूमीवर आधारित वेगवेगळ्या कथा यंदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ही पार्श्वभूमी म्हणजे, अंडरवर्ल्ड आणि इमर्जन्सी (आणीबाणी). 

कैदी बँण्ड आणि लखनौ सेंट्रल



बॉलिवूडचे  ‘शो मॅन’ राज कपूर यांचा नातू आणि राज कपूर यांची मुलगी रिमा जैन हिचा मुलगा आदर जैन ‘कैदी बँण्ड’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतो आहे. यशराज बॅनरचा हा चित्रपट हबीब फैजल डायरेक्ट करतो आहे. या चित्रपटाची कथा कच्च्या कैद्यांच्या अवती-भवती फिरणारी आहे. हे कच्चे कैदी तुरुंगात बँण्ड बनवतात व प्रसिद्ध होतात, असे याचे कथानक असणार आहे. आदर जैनचा डेब्यू सिनेमा ‘कैदी बँण्ड’ आणि फरहान अख्तरचा ‘लखनौ सेंट्रल’ या दोन चित्रपटांची कथा बरीच मिळतीजुळती आहे. काही कैदी रॉक बँण्ड बनवतात, अशीच  ‘लखनौ सेंट्रल’ची कथा आहे. रंजीत तिवारी हा चित्रपट डायरेक्ट करतो आहे.  
 
इंदू सरकार आणि बादशाहो



 मधुर भांडारकर यांचा अलीकडे रिलीज झालेला ‘इंदू सरकार’ या सिनेमाला आणीबाणीची पार्श्वभूमी होती. यावरून हा चित्रपट बराच वादातही सापडला होता. मिलन लुथरिया दिग्दर्शित ‘बादशाहो’ हा आगामी सिनेमाही याच पार्श्वभूमीवर आधारित आहे. म्हणजेच ‘इंदू सरकार’ व ‘बादशाहो’ या दोन्ही सिनेमांचे तार राजकीय घराण्याशी जुळलेले आहेत. अर्थात चित्रपटाच्या कथा वेगवेगळ्या आहेत. ‘बादशाहो’ चित्रपटात अजय देवगण लीड रोलमध्ये आहे.

 पॅडमॅन आणि फुल्लू



‘पॅडमॅन’ व ‘फुल्लू’ या दोन्ही आगामी सिनेमांची कथा वेगवेगळी आहे. पण ‘कन्सेप्ट’ म्हणाल तर तो अगदी समान आहे. ‘पॅडमॅन’मध्ये अक्षय कुमार लीड रोलमध्ये आहे. ‘पॅडमॅन’ या चित्रपटाविषयी बोलायचे झाल्यास हा चित्रपट अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या जीवनावर आधारित आहे. अरुणाचलम यांनी सॅनेटरी नॅपकिन बनविण्याचा सगळ्यात सोपा उपाय शोधून काढला होता. ‘फुल्लू’मध्येही अशाच एका व्यक्तीची कथा आहे. या चित्रपटात शारिब हाश्मी लीड रोलमध्ये आहे.

हसीना आणि डॅडी



येत्या काळात आणीबाणीशिवाय अंडरवर्ल्डवर आधारित दोन चित्रपट येत आहेत. हे दोन चित्रपट म्हणजे,‘हसीना’व ‘डॅडी’. हे दोन्ही चित्रपट बायोपिक आहेत. ‘हसीना’मध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर हिचे खरे आयुष्य दाखवण्यात आले आहे. यात श्रद्धा कपूर लीड रोलमध्ये आहे. तर ‘डॅडी’ हा सिनेमा अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीच्या आयुष्यावर आधारित आहे. यात अर्जुन रामपाल मुख्य भूमिकेत आहे.

 बॅटल आॅफ सारागढी, सन्स आॅफ सरदार



बॅटल आॅफ सारागढी सध्या हॉट टॉपिक आहे. या टॉपिकवर दोन चित्रपट आगामी काळात येणार आहेत.   दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा 'बॅटल आॅफ सारागढी' आणि दुसरा ‘सन्स आॅफ सरदार’.  चित्रपटाचे कथानक  १८९७ च्या लढाईत  वीरमरण आलेल्या २१ शीखांवर आधारलेले आहे.  या लढाईत ब्रिटीश आर्मीच्या शिख रेजिमेंटच्या  २१ शिपायांनी प्राणांचे बलिदान देत तब्बल दहा हजार अफगाणींना रोखून धरले होते. 'बॅटल आॅफ सारागढी' मध्ये रणदीप हुड्डा या चित्रपटात हवालदार ईश्वर सिंह याची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर ‘सन्स आॅफ सरदार’मध्ये अजय मुख्य भूमिकेत आहे.

 टॉयलेट एक प्रेमकथा आणि मेरे प्यारे प्रधानमंत्री



अक्षय कुमारचा ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ आणि दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरा यांचा ‘मेरे प्यारे प्रधानमंत्री’ या दोन्ही चित्रपटांची कथा एकदम वेगळी आहे. पण कन्सेप्टचा विचार केल्यास हे दोन्ही चित्रपट स्वच्छतेचा संदेश देताना दिसणार आहेत. 
 
सॅल्यूट आणि चंदा मामा दूर के



‘सॅल्यूट’ आणि ‘चंदा मामा दूर के’ हे दोन्ही चित्रपट आपल्याला अंतराळाची सैर करता येणार आहे. सेलिब्रेटेड अ‍ॅस्ट्रोनॉट राकेश शर्मा यांचे बायोपिक असलेल्या ‘सॅल्यूट’मध्ये आमिर खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. महेश मथाई हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. ‘चंदा मामा दूर के’ यात सुशांत सिंह राजपूत अ‍ॅस्ट्रोनॉटची भूमिका साकारताना दिसणार आहे. संजय पूरन सिंह चौहान या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

Web Title: Concept One; Many of the stories! Many movies coming on the same background!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.