Commando 2 Trailer Launch : विद्युत जामवालचा अॅक्शनपट ‘कमांडो २’ चा ट्रेलर आऊट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 13:16 IST2017-01-24T07:44:58+5:302017-01-24T13:16:25+5:30
बॉलिवूडमध्ये सध्या अॅक्शनपटांचा ट्रेंडच आलाय..‘बागी’ चित्रपटानंतर अॅक्शनपटांची सरबत्ती सुरू झाली ती ‘कमांडो २’ पर्यंत सुरूच आहे. नुकताच ‘कमांडो २’ चा ट्रेलर लाँच करण्यात आलाय..पाहा त्याची खास झलक तुमच्यासाठी...
.jpg)
Commando 2 Trailer Launch : विद्युत जामवालचा अॅक्शनपट ‘कमांडो २’ चा ट्रेलर आऊट!!
म ख्य अभिनेता विद्युत जामवाल म्हटल्यावर चित्रपटात ‘फुल्ल टू’ मारधाड, धिंगामस्ती, अॅक्शन प्लॅन्स, स्ट्रॅटेजीज हे सर्व पाहायला मिळते. ‘कमांडो’ रिलीज झाल्यानंतर सर्व चाहत्यांना उत्सुकता लागली होती की, आता ‘कमांडो २’ मध्ये काय नवीन पाहायला मिळणार ते? नुकताच ‘कमांडो २’ चा ट्रेलर लाँच करण्यात आलाय. ट्रेलर लाँच झाल्यावर अवघ्या १२ तासांमध्ये १२ लाख चाहत्यांनी हा ट्रेलर पाहिला. चित्रपट ३ मार्चला रिलीज होतो आहे. एंटरटेनिंग, रोमान्स, हॉट किंसींग सीन्स यांनी भरपूर असलेल्या या चित्रपटात विद्युत जामवालसह अदाह शर्मा, ईशा गुप्ता यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. संपूर्णपणे नवीन टीम आत्तापर्यंत कधीही एकमेकांसोबत काम केलेले नाही असे सर्व कलाकार या एकत्र दिसतील.
ALSO READ : Commando-2 effect : पाहा, अदा शर्माच्या बोल्ड अॅक्शन ‘अदा’!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ महिन्यापूर्वी ५०० व १००० रुपयांच्या चलनातील (नोटा) तत्काळ बंद करीत असल्याचे सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर आधारित एक चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येते. निर्माता विपुल शहा व दिग्दर्शक देवेन भोजानी यांच्या ‘कमांडो २’ या चित्रपटात एक राजकारणी काळ्या पैशांवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर पावले उचलित असल्याचे दाखविण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या कमांडोचे साधर्म्य सध्याच्या परिस्थितीशी जुळत असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘कमांडो २’ हा ‘कमांडो : अ वन मॅन आर्मी’ या चित्रपटाचा सिक्वेल असून यात काळा पैसा आणि भ्रष्टाचार विरोधातील कथानक ठरवण्यात आले आहे. हा चित्रपट हिंदी, तेलगु आणि तमिळ या तिन्ही भाषांमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाने बॉक्स आॅफिसवर उत्तम कमाई केली होती. आता हा सिक्वेल काय कमाल दाखवतो हे पहावे लागेल.