कॉफी विथ करण सीझन 5 लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 16:43 IST2017-02-24T11:13:36+5:302017-02-24T16:43:36+5:30

छोट्या पडद्यावर हिट राहिलेला चॅट शो कॉफी विथ करण सीझन 5 लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेण्यार असल्याचे समजतंय. कॉफी विथ ...

Coffee with Karan Season 5 will soon take away the audience? | कॉफी विथ करण सीझन 5 लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप ?

कॉफी विथ करण सीझन 5 लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप ?

ट्या पडद्यावर हिट राहिलेला चॅट शो कॉफी विथ करण सीझन 5 लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेण्यार असल्याचे समजतंय. कॉफी विथ करणमध्ये करण जोहर आतापर्यंत बॉलिवूड कलाकारांची अनेक गुपित उघडी झाली आहेत.

याबाबत अजून कोणतिही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॉफी विथ करण सीझन 5 चा शेवटचा एपिस़ोड 19 मार्चला टेलीकास्ट होणार आहे. मात्र त्यादिवशी शोमध्ये कोणत्याही सेलिब्रेटीबरोबर चॅट होणार नाही आहे. त्यादिवशी शोवर कॉफी अॅवॉर्ड्स दिले जाणार आहेत.याशोमधला बेस्ट मोमेंटला हा अॅवॉर्ड दिला जाणार आहे. या अॅवॉर्ड शोसाठी जूरी पण बनवण्यात आली आहे. ज्यात अयान मुखर्जी, मलायका अरोरा, नेहा धुपिया आणि रोहन जोशीचा सहभाग आहे. करणच्या शोमध्ये आतापर्यंत आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान, प्रियांका चोप्रा, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण सारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. आलिया भट्ट तर सीझन 5मध्ये दोन वेळा येऊन गेली आधी डिअर जिंदगीच्या प्रमोशनसाठी शाहरुख खान बरोबर तर त्यांना 10 मार्चला प्रदर्शित होणाऱ्या त्याचा आगामी सिनेमा बद्रीनाथ की दुल्हनियाच्या प्रमोशनसाठी. त्यामुळे खरी कसोटी तरी परीक्षकांची असणार आहे. परीक्षक कोणाची अॅवॉर्डसाठी निवड करतात हे बघण आता उत्सुकतेचे ठरणार आहे. 

कॉफी विथ सीझन 5 हा तसा अनेक अर्थाने चर्चेत आला. यावेळी शोमध्या येणाऱ्या जोड्यांचे पेअरही ओड होते. रणवीर सिंग आणि रणबीर कपूर, कतरिना कैफ आणि अनुष्का, फराह खान आणि सानिया मिर्झा अशा अनेक अनकॉमन जोड्यांना यावेळी शोमध्ये एकत्रित आमंत्रित करण्यात आले होते. 
  

Web Title: Coffee with Karan Season 5 will soon take away the audience?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.