​‘कॉफी विद डी’च्या प्रदर्शनाची तारीख बदलली; २० जानेवारीला होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2017 17:07 IST2017-01-08T17:07:53+5:302017-01-08T17:07:53+5:30

सुनील ग्रोव्हर व झाकिर हुसैन यांची भूमिका असलेला ‘काफी विद डी’ नव्या वर्षांत प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट ठरणार होता. ...

'Coffee With D' exposure date changed; Displays will take place on January 20th | ​‘कॉफी विद डी’च्या प्रदर्शनाची तारीख बदलली; २० जानेवारीला होणार प्रदर्शित

​‘कॉफी विद डी’च्या प्रदर्शनाची तारीख बदलली; २० जानेवारीला होणार प्रदर्शित

नील ग्रोव्हर व झाकिर हुसैन यांची भूमिका असलेला ‘काफी विद डी’ नव्या वर्षांत प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट ठरणार होता. मात्र अंडरवर्ल्ड मिळालेल्या धमकीमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन लांबले होते. आता या चित्रपटाचे प्रदर्शन २० जानेवारीला करण्याचा निर्णय निर्मात्यांना घेतला आहे. या सोबतच या चित्रपटाचे नवे पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे. यापूर्वी हा चित्रपट ६ जानेवारीला प्रदर्शित होणार होता. 

आतापर्यंत आलेल्या बातम्यांच्या आधारे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा खास मानूस छोटा शकील या चित्रपटाचा प्रोमो पाहून जाम चिडला आहे. यामुळे छोटा शकिलने निर्माता विनोद रमानी यांना फोनवरून दाऊदवर केलेले जोक्स सिन्स हटविण्यात यावे अशी धमकी दिली आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक व लेखज विशाल मीश्रा याने एका संकेतस्थळाला दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला छोटा शकीलच्या टीमकडून धमक्या मिळत आहेत. याची आम्ही पोलिसांत तक्रार केली असून सर्व फोन रेकॉर्ड पोलिसांना दिले आहेत. विशालने हे सर्व फोन कॉल दुबईच्या फोन नंबरहून येत असल्याचे सांगितले. 

sunil grovers film coffee with d is releasing on 20th jan

चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी पोलिसांत दिलेल्या आॅडिओ टेममध्ये एका माणसाचा आवाज असून, तो धमकी देताना ऐकू येतो. तो स्वत:ला दाऊदचा खास छोटा शकीलचा माणूस असल्याचे सांगतो आहे. टेपमधील संभाषणानुसार ‘हा फोन कोणत्याही प्रकारची रक्कम मागण्यासाठी केला नाही. भाईच्या नावावर ज्याला जेवढा पैसा कमवायचा आहे त्याने तो कमवावा, मात्र भाईच्या नावावर कॉमेडी करणे ही भाईची इज्जत धुळीस मिळविण्यासारखे आहे, यामुळे असे जेवढी दृष्ये असतील त्यांनी ते तत्काळ काढून टाकावेत. असा आवाज एैकू येतो. 

या चित्रपटात अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमवर कॉमेडी करण्यात आली आहे. कॉफी विद डी या चित्रपटात कॉमेडीयन सुनील ग्रोव्हर अर्नब नावाच्या एका पत्रकाराची भूमिका करीत असून, तो डॉन दाऊद इब्राहिमचा इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करतोत, यात तो यशस्वी देखील होतो. एकंदरीत या चित्रपटातून सुनील ग्रोव्हर दाऊद इब्राहिमची इज्जत धुळीस मिळविण्यास तयार आहे असे म्हणता येईल. या चित्रपटात जाकीर हुसैन याने दाऊद इब्राहिमची भूमिका साकारली आहे. 
या चित्रपटाला आता २० जानेवारीला प्रदर्शित करण्यात येणार असून नवे पोस्टर देखील रिलीज करण्यात आले आहे. 

sunil grovers film coffee with d is releasing on 20th jan

Web Title: 'Coffee With D' exposure date changed; Displays will take place on January 20th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.