टायगर श्रॉफसोबत रोमान्स करणार चंकी पांडेची मुलगी; ‘Student Of The Year-2’चे दोन पोस्टर रिलीज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 14:32 IST2018-04-11T08:57:02+5:302018-04-11T14:32:08+5:30

‘बागी-२’ या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर अ‍ॅक्शन अभिनेता टायगर श्रॉफ आता त्याच्या नव्या ‘स्टुडेंट आॅफ द ईयर-२’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त ...

Chunky Pandey's daughter romance with Tiger Shroff; Two of the 'Student Of The Year-2' posters release! | टायगर श्रॉफसोबत रोमान्स करणार चंकी पांडेची मुलगी; ‘Student Of The Year-2’चे दोन पोस्टर रिलीज!

टायगर श्रॉफसोबत रोमान्स करणार चंकी पांडेची मुलगी; ‘Student Of The Year-2’चे दोन पोस्टर रिलीज!

ागी-२’ या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर अ‍ॅक्शन अभिनेता टायगर श्रॉफ आता त्याच्या नव्या ‘स्टुडेंट आॅफ द ईयर-२’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाला आहे. धर्मा प्रॉडक्शन या बॅनरअंतर्गत निर्मित या चित्रपटाची शूटिंग सध्या डेहराडून येथे सुरू आहे. सध्या याठिकाणी दोन नव्या स्टुडेंटची एंट्री झाली आहे. होय, चित्रपटाच्या दुसºया भागात अभिनेत्री तथा मॉडेल तारा सुतारिया टायगरच्या अपोझिट बघावयास मिळणार आहे, तर चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे हीदेखील टायगरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. टायगरने चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज केले असून, त्यामध्ये तो दोन्ही अभिनेत्रींबरोबर अतिशय स्टनिंग अवतारात बघावयास मिळत आहे. 



बुधवारी ताराचा फर्स्ट लूक असलेले पोस्टर रिलीज करण्यात आले होते, ज्यामध्ये स्टुडेंट बनलेली तारा खूपच हॉट अंदाजात दिसत होती. टायगरने ताराचे पोस्टर शेअर करताना ट्विट केले होते की, ‘हे तारा --- फॅमिलीमध्ये तुझे स्वागत आहे. मला माहिती आहे की, माझ्यासारखीच तू देखील या चित्रपटासाठी एक्सायटेड आहेस. तुला क्लासमध्ये भेटतो.’ दरम्यान, तारा सुतारिया अभिनेत्री, गायिका आणि डान्सर आहे. तिने क्लासिकल बॅले, मॉडर्न डान्स आणि लॅटिन अमेरिकन डान्सची यूके येथे ट्रेनिंग केली आहे. त्याचबरोबर ‘तारे जमीं पर, गुजारिश आणि डेविड’ यासारख्या चित्रपटांमध्ये तिने डबिंगही केली आहे. ताराने व्हिडीओ जॉकी (व्हीजे) म्हणून डिज्नीमध्येही काम केले आहे. 





तर चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेदेखील या चित्रपटाच्या माध्यमातून इंडस्ट्रीत पाऊल ठेवत आहे. चित्रपटात अनन्याची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. अनन्याची गणना बॉलिवूडमधील मोस्ट स्टायलिश आणि पॉप्युलर स्टार मुलींमध्ये केली जाते. अनन्याला नेहमीच शाहरुख खानची मुलगी सुहाना खानसोबत बघण्यात आले आहे. अनन्या पांडे, सुहाना खान आणि संजय कपूरची मुलगी शनाया कपूर या तिघी बेस्ट फ्रेंड्स आहेत. त्या नेहमीच डिनर पार्टी, मुव्ही डेटला जाताना एकत्र बघावयास मिळतात. 



या दोन्ही अभिनेत्रींव्यतिरिक्त टायगर श्रॉफचाही नवा लूक समोर आला आहे. हा चित्रपट निर्माता करण जोहरच्या २०१२ मध्ये आलेल्या ‘स्टुडेंट आॅफ द ईयर’ या चित्रपटाचा सीक्वल आहे. या चित्रपटात वरुण धवन, आलिया भट्ट  आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी काम केले होते. या तिघांनी या चित्रपटाच्या माध्यमातूनच आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. आज हे तिन्ही स्टार्स इंडस्ट्रीमध्ये यशस्वी ठरताना दिसत आहेत. 

Web Title: Chunky Pandey's daughter romance with Tiger Shroff; Two of the 'Student Of The Year-2' posters release!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.