‘चक दे’ गर्ल्स पुन्हा एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 20:16 IST2016-03-30T03:16:11+5:302016-03-29T20:16:11+5:30
‘चक दे’ या चित्रपटातील महिला हॉकी टीम आठवते. ही टीम अलीकडे पुन्हा एकत्र दिसली. निमित्त होते, शुभी मेहता हिच्या ...

‘चक दे’ गर्ल्स पुन्हा एकत्र
‘ क दे’ या चित्रपटातील महिला हॉकी टीम आठवते. ही टीम अलीकडे पुन्हा एकत्र दिसली. निमित्त होते, शुभी मेहता हिच्या लग्नाचे. शुभी मेहता हिने ‘चक दे!इंडिया’मध्ये गुंजन लखानी ही व्यक्तिरेखा साकारली होती. ‘चक दे!इंडिया’ चित्रपटानंतर तब्बल नऊ वर्षांनी ‘चक दे’ गर्ल्स एकत्र आलेल्या दिसल्या. शिल्पा शुक्ला, चित्रश्री रावत, आर्या मेनन, गुल इक्बाल, तनया अबरोल अशा सगळ्याजणी शुभीच्या लग्नाच्या निमित्ताने एकत्र आल्या. मग काय, सांगायलाच नको, सगळ्या जणींनी मिळून लग्नात एकच धमाल केली. अर्थात या टीमचा कोच कबीर खान अर्थात आपला शाहरूख खान हो, या लग्नसोहळ्यात ‘मिसींग’ राहिला. तो असता तर, तर काय, आणखी मस्त धम्माल आली असती.
![]()
‘चक दे!इंडिया’ने एका रात्रीतून प्रकाश झोतात आलेल्या शुभी मेहता बेंगळुरूच्या अपूर्व वाजपेयीसोबत विवाहबंधनात अडकली. शुभी व अपूर्वचा प्रेमविवाह आहे. २०१४ मध्ये एका कॉन्क्लेवमध्ये या दोघांची भेट झाली होती. अपूर्व हा गुडगावच्या एका प्रायव्हेट कंपनीत एक्सपेरियंटल एज्युकेटर आहे.